Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाचा चौथा आठवड्याचा भाऊचा धक्का काल दणक्यात झाला. यंदाचा हा भाऊचा धक्का रितेश देशमुखने विशेष गाजवलेला पाहायला मिळाला. स्पर्धकांची शाळा घेत हा आठवडा चर्चेत राहिला. भाऊच्या धक्क्याची सुरुवातच आणि शेवट स्पर्धकांची शाळा घेत केली. अगदी पहिल्या मिनिटापासून रितेशने स्पर्धकांचा पाणउतारा करायला सुरुवात केली होती. यादरम्यान रितेशने टीम ए ची चांगलीच शाळा घेतली. टीम एमधील जान्हवी किल्लेकरच्या या आठवड्यातील एकूणच वागणुकीवर रितेशने भाष्य केलं.
आधी वर्षा ताईंना मग नंतर पॅडी कांबळेला त्यांच्या करिअरवरुन बोलणं, सततचा अपमान करणं, वाटेल ते तोंडाला येईल ते बोलत राहणं यामुळे ते सुद्धा, मी सुद्धा आणि प्रेक्षक सुद्धा नाराज असल्याचे सांगत रितेशने जान्हवीला खूप मोठी शिक्षा दिली. जान्हवीला रितेशने थेट बाहेर काढायचा निर्णय घेतला. जान्हवीला घराबाहेर यायला सांगितल आणि गार्डन एरियामध्ये एक जेल ठेवला आणि सांगितलं की, आज पासून तुम्ही एक आठवडा या जेलमध्येच राहणार. इतकंच नव्हे तर आजच्या व उद्याच्या भाऊच्या धक्क्यावर ही जान्हवीला स्थान नाही असे देखील त्यांनी म्हटलं. याशिवाय जान्हवी या तुमच्या नावाचा उल्लेख करणे मला चुकीचा वाटते त्यामुळे बाहेर बसलेल्या असं म्हणतच त्याने अड्ड्यावर त्यांचं नाव घेतलं.
जान्हवीची शाळा घेत रितेश देशमुख असे म्हणाला की, “जान्हवी तुम्ही ‘बिग बॉस’ मराठीच्या इतिहासातील सर्वात वाईट स्पर्धक आहात. तुम्ही या सगळ्यांना म्हणता ना, ए मी बाहेर काढेन. तुमचा माज, तुमची दादागिरी आज सगळं इथे बंद होणार आहे. आता मी तुम्हाला बाहेर काढतो. दरवाजा उघडा. तुम्ही यापुढे भाऊच्या धक्क्यावर बसायचं नाही. इथे तुमची जागा नाही तुमची जागा बाहेर”, असं म्हणत तिला बाहेर काढलं.
गेल्या आठवड्यात जान्हवीने ‘बिग बॉस’च्या घरात केलेली भांडणं, चुकीची वक्तव्य याशिवाय पंढरीनाथ कांबळे यांच्याच्या करिअरवर केलेली टीका यामुळे तिच्या विरोधात सर्वत्र नाराजी पसरली होती. नेटकऱ्यांसह अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जान्हवीला बाहेर काढण्याची मागणी केली होती. अखेर भाऊच्या धक्क्यावर रितेशने या सगळ्याचा हिशोब घेत जान्हवीला तिची जागा दाखविली.