Bigg Boss Marathi 5 : छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन दिवसेंदिवस रंगतदार ठरत आहे. नुकताच बीबी करन्सीसाठी घरातील स्पर्धकांना टास्क देण्यात आला होता. त्यासाठी स्पर्धकांना टीम ए आणि टीम बी अशी विभागणी करण्यात आली. टीम एमध्ये निक्की, जान्हवी, वैभव, इरीना, सूरज आहेत. हाअ आठवडा घरातील दोन स्पर्धकांमुळे चांगलाच गाजला आणि हे दोन स्पर्धक म्हणजे जान्हवी किल्लेकर व निक्की तांबोळी. दोघींच्या वर्तणुकीमुळे ‘बिग बॉस’च्या घरात तुफान राडे झाले आणि याच राड्याचा समाचार आता रितेश देशमुख घेणार आहे. शनिवार व रविवार होणाऱ्या भाऊचा धक्कामध्ये रितेश सर्वांची शाळा घेणार आहे.
भाऊचा धक्काचा एक नवीन प्रोमो शेंअर करण्यात आला आहे. ज्यात रितेश निक्कीवर चांगलाच संतापला असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी रितेश निक्कीलं असं म्हणतो की “मी रितेश देशमुख आहे. मला हलक्यात घेऊ नका” अशा कडक शब्दांत सुनावलं आहे. रितेश देशमुखच्या या वक्तव्यानंतर निक्कीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला आहे. या नवीन प्रोमोमध्ये रितेश फक्त निक्कीचं नाही तर तिच्या टीममधील इतर लोकांचा देखील चांगलाच समाचार घेताना दिसत आहे .
आणखी वाचा –
या प्रोमोमध्ये रितेश पुढे निक्कीला असं म्हणत आहे की, “निक्की तुम्ही हलक्या कानाचे आहात आणि तुमची बुद्धी पण हलकीच आहे. तुम्हाला या घरातील काही मंडळी चालवत आहेत. तु चावी मारतात आणि तुम्ही चालू होता. चावीचं माकड असतं ना?”. त्यामुळे एकूणच आजच्या भाऊचा धक्कावर रितेशकडून निक्कीचा चांगलाचं पाणउतारा केला जाणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चा ‘भाऊचा धक्का’चा हा नवीन प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं असून या नवीन प्रोमोला प्रेक्षकांकडूनही तुफान प्रतिसाद मिळत आहे. “आजचा धक्का जोरात होणार असं वाटतंय”, “भाऊ चांगलेच पेटले आहेत”, “आता निक्कीला तिची जागा कळेल”, “असंच पाहिजे निक्कीला” अशा अनेक कमेंट्स करत या प्रोमोला प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा –
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या गेल्या आठडव्यात निक्की कॅप्टन झाली आहे. अरबाजकडून तिला ही कॅप्टन्सी तिच्या वाढदिवसानिमित्त मिळाली असून ती कॅप्टन होताच तिची दादागिरी पाहायला मिळाली. मी कॅप्टन आहे, त्यामुळे मी पाहिजे ते करेन” अशा शब्दांत तिने सर्वांशी वागणूक केली आहे. त्यामुळे आता तिचा हा माज रितेश उतरवणार असल्याचे पाहायला मिळत आहे.