Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दोन टीम झालेल्या पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या टीम ए व टीम बी मध्ये तुफान राडे होताना पाहायला मिळाले आहेत. टीम ए मधील स्पर्धकांमध्ये घट्ट मैत्री असल्याचे दिसलं तर टीम बी मध्ये फाटाफूट असल्याचे दिसलं. असं असलं तरी वेळोवेळी दोन्ही टीमने आम्ही एकमेकांच्या बरोबर आहोत असं सिद्ध केलं. दरम्यान नुकत्याच झालेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने स्पर्धकांची चांगली शाळा घेतलेली पाहायला मिळाली. रितेशने स्पर्धकांची शाळा घेत त्यांच्यावर तो चांगलाच भडकलेला दिसला. तर टीम बीच्या खेळाचं, टीमच्या मैत्रीचं रितेशने विशेष कौतुक केलं.
टीम ए मध्ये निक्की तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, घनश्याम दरवडे, जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक पाहायला मिळत आहेत. टीम ए चा सध्याचा कॅप्टन असून त्याच्या मागे काय काय होतं याबाबतचा रितेशने खुलासा केला. यंदाच्या आठवड्याची कॅप्टन पदाची मानकरी निक्की तांबोळी ठरली आहे. निक्कीचा तिच्या टीममधील लोकांवर प्रचंड विश्वास आहे आणि हाच विश्वास धक्का देणारा असल्याच रितेशने सांगितलं. रितेशने निक्कीच्या मागे त्यांच्या टीममधील स्पर्धकांनी केलेलं गॉसिप सगळ्यांसमोर सांगितलं.
आणखी वाचा – 25 August Horoscope : वृषभ, कन्या आणि कर्क राशीसाठी रविवारचा दिवस आनंददायी, कुणाच्या नशिबात काय? जाणून घ्या…
निक्की जेव्हा कॅप्टन झाली तेव्हा कॅप्टन झाल्यावर निक्कीच वागणं बदललंय. एक वेगळाच एटीट्यूड आला आहे असं म्हणत अरबाजने आणि त्या बाहेर बसलेल्या स्पर्धकाने (जान्हवी किल्लेकर)ने चर्चा केली. हे ऐकून निक्कीला खूप मोठा धक्का बसला. निक्की अरबाजकडे पाहू लागली तेव्हा रितेश देशमुखनेही टोकलं आणि म्हणाला की, अरबाज बरोबर आहे ना?. यावर अरबाजने फक्त मान डोलावली. अरबाज म्हणाला, “मी निक्कीला याबाबत तोंडावरही बोललो की तुझं वागणं बदललं आहे”.
यावर रितेशने अरबाजला थांबवत म्हटलं, निक्की कॅप्टनच्या रूममध्ये असताना तुम्ही त्या बाहेर बसल्या आहेत त्या यांनी बेडरुममध्ये निक्कीबाबत गॉसिप केलं की नाही?”, यावर निक्की म्हणाली, “बाप रे”. तेव्हा रितेश म्हणाला, “बाप रे नाही बाप रे बाप”. आणि रितेशने अरबाज व जान्हवीमध्ये निक्कीबाबत केलेल्या गॉसिपचा खुलासा केला.