Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा फिनाले वीक सुरु झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. या फिनाले वीकपूर्वीच्या नॉमिनेशनमधून प्रेक्षकांचा लाडका पॅडी कांबळेला एक्झिट घ्यावी लागली. पॅडी कांबळेचं जाणं अनेकांना खटकलं. फिनाले वीकमध्ये जाण्याची संधी पॅडीला हुकली त्यामुळे त्याने घराबाहेर पडताना नाराजीही व्यक्त केली. पॅडी कांबळेचा हा प्रवास संपला असून एका चांगल्या स्पर्धकाला घराबाहेर पडावं लागलं म्हणून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंढरीनाथने अगदी पहिल्या दिवसापासून स्वत:चा खेळ सांभाळून सूरजला प्रत्येक अडचणीत खंबीरपणे साथ देत हा खेळ खेळला. पॅडीचा सर्वांना मदत करण्याचा स्वभाव प्रत्येकाला भावला होता.
घराबाहेर आल्यानंतर आता पॅडीने माध्यमांना मुलाखती द्यायला सुरुवात केली आहे. नुकतीच पॅडीने ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत निक्की व अरबाजबाबत भाष्य केलं आहे. निक्की व अरबाज यांच्या नात्याबाबत पॅडीने भाष्य करत असं म्हटलं की, “त्यांचं नातं खरंच पाहण्याची कोणाचीच इच्छा नव्हती. त्यांच्या जवळ जाऊन कोणीच काहीच पाहिलं नव्हतं. त्यांचा खोटेपणा आम्हालाही आणि प्रेक्षकांनाही दिसत होता. त्यांचं नातं हे खेळापुरतं मर्यादित होतं. त्यांनी तशी काळजी घेऊनच हे नातं टिकवलं. त्याचं उत्तरही मिळालं की, निक्कीची आई घरी आली होती तेव्हा तिने अरबाजचा साखरपुडा झाला असल्याचं सांगितलं, त्यामुळे हे नातं तेवढ्यापुरतं होतं”.
पुढे ते म्हणाले, “ते चांगले मित्र आहेत, ते घट्ट मित्र आहेत असं नेहमीच दाखवत आले. एकदा निक्की आली आणि तिने सर्वांना विचारलं, आम्ही इथे किस वगैरे केलं तर कोणाला प्रॉब्लेम आहे का?, यावर आर्या की वर्षा ताई यांनी आक्षेप घेतला. तुम्ही काही केलं तरी आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही पण तुम्ही हे आमच्या डोळ्यसमोर केलं तर ते चुकीचं आहे, कारण आपण असं घरात करत नाही. गळ्यात गळे घालून बसणं, कमरेत हात घालून बसणं या गोष्टी आपण घरातील मंडळी असताना करत नाही. ते मग घरातल्यांना खटकतं”.
पुढे तो असंही म्हणाला की, “मी स्वतः माझ्या मुली असताना माझ्या बायकोबरोबर असं बसत नाही. त्यामुळे त्यांनी यावर आक्षेप घेतला होता. पण त्यांना काय करायचं आहे हा त्यांचा लूकआऊट आहे. पण ते जे काही करत होते ते सगळं खोटं होतं. निक्कीची आई आली तेव्हा तिने तिला सावध केलं की, तू असं काही करु नकोस, तू खूप वेगळी दिसत आहेस आणि तो काही वेगळाच आहे. मला असं वाटतं की, खोटी लोक फार टिकत नाहीत. काही काही टिकतात, पण त्यांचा शेवट काही बरा होत नाही”.