Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी सीजन 5’ चं पर्व विशेष गाजताना दिसतंय. यंदाच्या या पर्वात सर्व स्पर्धक मंडळींनी धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. मात्र, आता या पर्वाचे काही शेवटचे दिवस शिल्लक असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’चं हे पर्व 100 दिवसांचा नसून 70 दिवसांच असणार असल्याच समोर आल्यापासून साऱ्यांना ट्रॉफीची उत्सुकता लागून राहिली आहे. विजेते पदावर कोणता स्पर्धक नाव कोरणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अगदी फिनाले वीक मध्ये ही स्पर्धकांमध्ये वादावादी, भांडण होताना पाहायला मिळाली. फिनाले विक असुनही स्पर्धक मंडळी त्यांच शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करताना दिसतायत.
यंदाच्या पर्वात विशेष चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजेच निक्की तांबोळी. निक्की तांबोळीने अगदी पहिल्या दिवसापासून ‘बिग बॉस’च्या घरात राडे करायला सुरुवात केली. असा एकही स्पर्धक नाही आहे ज्याच्याबरोबर निक्कीचं भांडण झालं नसावं. तिच्या भांडणाने हा शो उचलून धरला असं म्हणणं वावगही ठरणार नाही. आता अगदी शेवटच्या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात सात स्पर्धक उरले असल्याचे पाहायला मिळतंय. मात्र या स्पर्धकांमधून आता सहा स्पर्धक नॉमिनेट झाल्याचे समोर आलं. तर एका स्पर्धकाने तिकीट टू फिनाले मिळवत ग्रँड फिनाले मध्ये एन्ट्री केल्याचे पाहायला मिळत आहे. आणि ही स्पर्धक म्हणजेच निक्की तांबोळी.
निक्की तांबोळी ने फिनाले जिंकत आणि सूरज ला बाद करत ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश केला आहे. निक्कीने सूरजवर मात केलेली पाहायला मिळाली शिवाय अरबाज कडून देण्यात येणाऱ्या कॉइंसमुळे निक्कीला याचा खूप फायदा झाला असल्याच समोर आलं. तर बाबा गाडीच्या टास्कमध्येही निक्कीने सूरजला हरवत विजय मिळवला. आता निक्की ही ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची पहिली ग्रँडफायनलीस्ट आहे. तर इतर उर्वरित सहा सदस्यांना बिग बॉस यांनी नॉमिनेट केलं असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच ‘बिग बॉस’ यांनी या घरात आणखी एक एलिमीनेशन मिडविक मध्ये होणार असल्याचे सांगितले त्यामुळे साऱ्या स्पर्धकांना खूप मोठा धक्का बसलाय.
या सहा स्पर्धकांपैकी कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार याची आता साऱ्यांनाच भीती वाटू लागली आहे. हे एलिमीनेशन वोटिंग नुसार होणार असल्याचे सांगण्यात आलंय. २ ऑक्टोंबर पर्यंत वोटिंग लाईन सुरु असल्याचे समोर आलं असून आता या वोटिंगच्या शर्यतीत कोणता स्पर्धक बाजी मारणार हे सारं पाहणं आगामी भागात रंजक ठरणार आहे.