अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी आज सकाळी आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे. ही घटना सकाळी ९ च्या सुमारास घडली. अनिल यांनी वांद्रे येथील घरातून उडी मारुन आत्महत्या केली. असे करण्यामागील कारणे अद्याप समोर आलेली नाहीत. दरम्यान, आता मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान कुटुंबासह घटनास्थळी पोहोचला आहे. मलायकाला तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी मिळाली तेव्हा ती पुण्यात होती. माहिती मिळताच ती तात्काळ मुंबईला रवाना झाली आहे. (Malaika Arora Father Death)
गेल्या वर्षी अनिल अरोरा यांना प्रकृतीच्या त्रासामुळे मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी मलायका आई जॉयससह हॉस्पिटलमध्ये दिसली. मात्र, त्यांच्यावरील उपचाराचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली असल्याचे समजताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आत्महत्येमागील ठोस कारण समोर आले नाही.