‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या नॉमिनेशन प्रक्रिया नुकतीच पार पडलेली पाहायला मिळाली. या आठवड्यात घराचा कॅप्टन सूरज चव्हाण असल्यामुळे तो या आठवड्यात सुरक्षित आहे आणि संग्रामने नुकतीच वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एण्ट्री घेतल्याने तोसुद्धा या आठवड्यात सुरक्षित असून या टास्कचा संचालक आहे. मागील आठवड्यातील टास्कमध्ये या सदस्यांची असमाधानकारक कामगिरीच्या निकषानुसार सदस्याला नॉमिनेट करायचं आहे. ज्या सदस्याला नॉमिनेट करायचं आहे त्या सदस्याचा फोटो संपूर्ण टास्कभर गळ्यात अडकवायचा असतो. (Bigg Boss Marathi Season 5)
नॉमिनेशन टास्कमध्ये स्पर्धक गळ्यात अडकवलेल्या स्पर्धकाचा खेळ कसा वाईट होता याबाबत कारण द्यायचं आहे. तिसऱ्या फेरीत वैभव, आर्या व अभिजीत यांच्यात बाचाबाची होते. धनंजयच्या गळ्यात अभिजीतच्या नावाची पाटी असते. धनंजयला अभिजीतला नॉमिनेट करायचे नसते मात्र त्याला टास्कमुळे हे करावंच लागतं. त्यावेळी निक्की डीपीला तो गेल्या आठवड्यात खेळलाच नाही तू ती कारण देऊन त्याला नॉमिनेट कर असं सांगते.
निक्कीचं हे बोलणं अभिजीतला पटत नाही. त्यामुळे निक्की व अभिजीत यांच्यात बाचाबाची होते. अभिजीतही नॉमिनेट होतो. या आठवड्याची घराबाहेर जाण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून या आठवड्यात वर्षा, आर्या, वैभव, अंकिता, अभिजीत आणि निक्की हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. दरम्यान, अंकिताच्या गळ्यात जान्हवीचा फोटो असतो, अंकिताने दिलेलं कारण ग्राह्य न धरल्याने ती नॉमिनेट होत नाही.
त्यावेळी, निक्कीच्या मते जर अभिजीतने अंकिताला जान्हवीला नॉमिनेट करु नको असं सांगायला हवं होतं कारण जान्हवी त्याला त्याच्या ग्रुपमध्ये हवी आहे. यावरुन अभिजीत व निक्कीमध्ये वाद होतो. या वादात अंकिता मध्ये पडते. तेव्हा अभिजीत रागाच्या भरात अंकिताला सुनावतो, तू काय केलं आहेस ते आधी बघ असं अभिजीत अंकिताला सांगत गप्प करतो. प्रत्येकाला आपापला निर्णय योग्य वाटतो असंही तो म्हणतो.