Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या तुफान राडा सुरु असलेला पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. तर या तिसऱ्या आठवड्याच्या कॅप्टन पदाची जबाबदारी कोणता स्पर्धक सांभाळणार यासाठी स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. सर्व स्पर्धक आपण सेफ व्हावं आपणही कॅप्टन व्हावं यासाठी वैयक्तिकरित्या खेळताना दिसत आहेत. यंदाच्या पर्वाने केवळ अभिनेत्री, अभिनेते यांनाच नव्हे तर गायक, रील स्टार, रॅपर अशा विविध क्षेत्रातील कलागुणांना ही वाव दिलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही विविध क्षेत्रातील मंडळी एकत्र येत आपापली ओळख जगासमोर आणत आहेत.
सध्या ‘बिग बॉस’च्या या नव्या पर्वाची तुफान चर्चा सुरु असलेली पाहायला मिळतेय. यंदाच्या सीजनमधील तिसऱ्या आठवड्याचा कॅप्टन नेमका कोण होणार यासाठी स्पर्धकांना एक नवा टास्क देण्यात आला आहे. समोर आलेल्या टास्कमध्ये असं पाहायला मिळत आहे की, सर्व स्पर्धकांचे दोन गट करण्यात आले आहेत आणि दोन्ही गटांना जास्तीत जास्त मोती संदुकीमधून गोळा करुन ते गार्डन एरियामधील बोटीमध्ये लोड करायचे आहेत. हा खेळ सुरु असताना सगळे स्पर्धक आपापल्या परीने मोती गोळा करायचे प्रयत्न करतात. यावेळी हा खेळ खेळताना अभिजीत खाली पडतो आणि त्याचा पाय मुरगळतो. त्यावेळेला ‘बिग बॉस’ घोषणा करत हा खेळ थांबवतात.
आणखी वाचा – Video : डीपीने निक्कीला पकडलं, सूरज अंगावर धावून गेला अन्…; Bigg Boss च्या घरात मोठी हाणामारी, माणूसकी हरवली
अभिजीतच्या पायाला दुखापत झाल्याच समजताच सगळे स्पर्धक त्याच्याजवळ येतात. अभिजीतच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये अभिजीतच्या पायाला दुखापत झाल्याच दिसत असून त्याला धनंजय व वैभव यांनी दोन्ही खांद्यावर आधार दिला असून ते घेऊन जाताना दिसत आहेत. अभिजीतच्या पायाला झालेली दुखापत पाहून चाहते मंडळींनी ही काळजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर अभिजीतचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अभिजीतने आजवर त्याच्या गायनाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे.

ही अवस्था पाहून केवळ प्रेक्षक मंडळीच नव्हे तर कलाकार मंडळींनी ही अभिजीतला पूर्ण पाठिंबा देत आहेत. नेहमीच ‘बिग बॉस’च्या वक्तव्यावर भाष्य करणाऱ्या ‘बिग बॉस’ सीजन १ च्या विजेत्या मेघा धाडे यांनी अभिजीतला या पोस्टखाली कमेंट करत पाठिंबा दर्शविला आहे. मेघाने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “घायाळ सिंह तीव्रतेने अधिक आक्रमक होतो. आम्ही सर्व तुझ्याबरोबर आहोत. छान खेळ”.