‘बिग बॉस मराठी’चे घर म्हटलं की वाद, मारामारी, आरडाओरड, भांडण, तंटा हे सगळं काही आलं. सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या या नव्या पर्वानेही अक्षरशः धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. सातव्या आठवड्यात पहिल्या दिवसापासून हे पर्व विशेष गाजताना दिसत आहे. तुफान राडे करत स्पर्धक मंडळी खेळ खेळताना दिसत आहेत. या स्पर्धकांमध्ये भर घालत आता आणखी एका स्पर्धकाची एण्ट्री झालेली पाहायला मिळत आहे. हा स्पर्धक म्हणजेच सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर संग्राम चौगुले. वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून संग्रामने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एण्ट्री केलेली पाहायला मिळाली. (Bigg Boss Marathi Season 5)
आपल्या ताकदीनं संग्राम घरात खेळ खेळू लागला असल्याचा पाहायला मिळत आहे. या स्पर्धकाचा पहिलाच आठवडा असल्यामुळे तो नॉमिनेशन प्रक्रियेतून बचावला. आता तो घरातील पहिला टास्क खेळत असल्याच समोर आला आहे. आणि या टास्कदरम्यान आता संग्राम साऱ्यांना कोणती जादू दाखवणार?, कोण त्याला ताकद दाखवणार का हे पाहणं रंजक ठरत असतानाच समोर आलेल्या प्रोमोने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, टास्क दरम्यान स्पर्धक मंडळी भांडताना दिसत आहेत. तर अरबाज त्याच्या ताकदीने खेळताना दिसतोय. मात्र आता अरबाजच्या ताकदीला उत्तर देण्यास संग्राम चौगुलेची ताकद भारी पडत असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.
प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अरबाजला त्याचा खेळ खेळायचा आहे मात्र त्याला सगळे जण अडवत असतात. तेव्हा तो सगळ्यांवर जोरात ओरडतो. निक्कीसुद्धा त्याला लांब घेऊन जात अडवत असते तर पॅडी कांबळेही रागाने काहीतरी लांब फेकून देतात. सगळ्यांचा राग अनावर झालेला टास्कमध्ये पाहायला मिळत आहे. संग्राम अरबाजवर भरपूर चिडतो आणि त्याला उत्तर देताना दिसतोय.
अरबाज संग्रामला बोलतो, “तू माझ्यावर ओरडू नकोस”. यावर संग्राम म्हणतो, “तू गप्प बस. मध्ये येऊ देणार नाही. चल बाहेर चल. तुझ्यात किती ताकद आहे ते बघूया. चल दोघे बाहेर जाऊ मग दाखवतो माझ्यात किती ताकद आहे”, असं म्हणत अरबाज व संग्राम बाजूला जाऊन लढाई करु लागतात. वैभव अरबाजला थांबवायचा प्रयत्न करतो मात्र तो कोणाचं ऐकत नाही.