शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Malaika arora father death : घटस्फोटानंतरही एकत्रित राहत होते मलायकाचे आई-वडील, आत्महत्येनंतर पहिल्यांदाच पत्नी म्हणाली, “बाल्कनीमध्ये दिसले नाहीत तेव्हा..”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 12, 2024 | 1:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
malaika arora mother on father death

मलायकाच्या आईने सांगितला वडिलांच्या आत्महत्येदरम्यानचा प्रसंग

सध्या बॉलिवूडमधील अभिनेत्री मलायका आरोराच्या घरी सध्या दु:खाचे वातावरण आहे. बुधवारी सकाळी तिच्या वडिलांनी इमारतीच्या छतावरुन उडी मारुन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. त्यांचे पार्थिव आता रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिस आता पुढील तपासणी करत असून त्यांच्या मृत्यूचे कारण लवकरच शोधून काढतील असे म्हंटलं जात आहे. आता याबाबत अनेक खुलासेदेखील होताना दिसत आहेत. मृत्यूसमयी त्यांच्याजवळ कोणतीही चिट्ठि आढळून आली नाही. मात्र त्यांची पत्नी जॉयस पॉलिकार्प यांनी दिलेली माहिती समोर आली आहे. (malaika arora mother on father death )

अनिल यांच्या मृत्यूबद्दलची माहिती जॉयस यांनी दिली आहे. बुधवारी सकाळी नक्की काय झाले याबद्दल त्यांनी सांगितले आहे. ‘न्यूज १८’च्या अहवालानुसार, मलायकाच्या आईने अनिल यांचा दिनक्रम संगितला. त्यांनी सांगितले की, अनिल रोज सकाळी बाल्कनीमध्ये बसून वर्तमानपत्र वाचत असत. त्यांचा घटस्फोट झाला होता मात्र गेल्या काही वर्षांपासून ते पुन्हा एकदा एकत्र राहू लागले होते. ते आयशा मॅनोरच्या सातव्या मजल्यावर राहायचे.

आणखी वाचा – Video : वडिलांच्या आत्महत्येच्या बातमीने मलायका हादरली, घराखाली पोहोचताच ढसाढसा रडू लागली अन्…, मन हेलावून टाकणारा व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

जॉयस यांनी सांगितले की, “बुधवारी सकाळी ते लिव्हिंग रुममध्ये अनिल यांच्या चप्पल पाहिल्या व त्यांना बघण्यासाठी बाल्कनीमध्ये गेले. जेव्हा ते बाल्कनीमध्ये पण दिसले नाहीत तेव्हा मी वाकून खाली पाहिले. वॉचमन मदतीसाठी ओरडत होते. अनिल खाली पडले होते”. अनिल यांच्या तब्येतीबद्दल सांगायचे झाले तर ते गेल्या काही काळापासून आजारी होते. पण मलायकाच्या आईने हे सगळं नाकारलं. त्यांना कोणताही आजार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांचे फक्त गुडघे दुखायचे”.

आणखी वाचा – मलायकाच्या वडिलांनी ख्रिश्चन मुलीशी केलं होतं लग्न, इंडियन नेव्हीमध्ये होते कामाला, कुटुंबात आणखी आहे कोण-कोण?

‘एएनआय’च्या वृत्तानुसार, सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनास्थळी सगळी टीम पोहोचली. या प्रकरणाचा योग्य रीतीने तपास केला जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान वाडिलांच्या निधनाची माहिती मिळाली तेव्हा ती पुण्यात होती. ती तडक निघाली आणि मुंबईतील घरी पोहोचली. तसेच वाडिलांच्या निधनाची माहिती मिळताच अरबाज खानही तिथे पोहोचला. तसेच खान कुटुंबानेदेखील मलायकाला खूप धीर दिला आहे.

Tags: bollywood actressmalaika aroraMalaika Arora Father Death
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
sambhavna seth on ivf treatment

“मूल होत नाही म्हणून हिणवलं...”, आई होऊ शकत नसल्याने ऐकावे लागले होते टोमणे, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “खूप त्रास...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.