‘बिग बॉस मराठी’च्या घरात तुफान राडे सुरु असतानाच नुकत्याच कॅप्टनसी टास्क दरम्यान झालेल्या खेळात खूप मोठी घटना घडली असल्याचे समोर आले. ‘बिग बॉस’ यांनी स्पर्धकांना काही हिरे, मोती घरामध्ये लपवले असल्याचे सांगत ते शोधून काढायला सांगतात, जो स्पर्धक हे शोधून काढेल तो स्पर्धक घरातील एका सदस्याला कॅप्टनसी टास्क मधून बाद करु शकतो, असं ‘बिग बॉस’ सांगतात. खेळ सुरु होतो तेव्हा सगळेच जण आपापल्या पद्धतीने हा खेळ खेळू लागतात. सर्वप्रथम जान्हवी हिऱ्याचा शोध घेते आणि कॅप्टनसी मधून अनपेक्षितपणे अरबाजला बाहेर काढते. हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. (Bigg Boss Marathi Season 5)
त्यानंतर दुसऱ्यांदा तो बॉल वैभवच्या हाती लागतो, तेव्हा निक्की व अरबाज वैभवला धनंजयला बाद करायला सांगतात मात्र आत मध्ये गेल्यावर वैभव असे न करता सूरजला बाद करतो. त्यामुळे टीम बी नाराज होते. त्यानंतर पुन्हा खेळ सुरु होतो. तेव्हा वर्षाताई एका हिऱ्यावर लक्ष ठेवत असतात तर जान्हवी व आर्या हे सुद्धा त्यांना मदत करत असतात. त्यावेळेला निक्की मुद्दाम त्यांच्यामध्ये येते आणि त्यांना अडवून दाखवते. त्यावेळेला आर्याचा पारा चढतो आणि आर्या व निक्कीमध्ये बाचाबाची होते. निक्की मुद्दाम खोटेपणा करत असल्याचे पाहत आर्या तिला पकडते आणि तिच्या सणसणीत कानाखाली लगावते. कानाखाली मारताच निक्कीचाही राग अनावर होतो आणि ती रडत रडत बाहेर जात ‘बिग बॉस’ कडे विनंती करते की, आर्याने मला मारलं आहे.
आणखी वाचा – आई झाल्यानंतर ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीला मिळतायत ‘भाभी’च्या भूमिका, स्वतःच केला खुलासा, म्हणाली…
”हे किती चुकीचे आहे त्यामुळे तुम्ही तिला आताच्या आता घराबाहेर काढा नाहीतर मला तरी घराबाहेर काढा”, तर इकडे आर्या सुद्धा म्हणते की, “आता काही झालं तरी चालेल मला काहीच फरक पडत नाही मी बाहेर गेली तरी चालेल निश्चित सगळ्याच खेळांमधीलपणा आता आर्यन बाहेर काढलेला असतो त्यामुळे निखिल ही मोठी शिक्षा मिळालेली असते मात्र बिग बॉसच्या नियमानुसार घरात नियमांचे उल्लंघन करणे हे चुकीचं आहे शिवाय कोणालाही कोणावरी हात उचलणं हे अत्यंत निंदनीय गोष्ट असल्याने बिग बॉस सुद्धा याची दखल घेत आर्याला शिक्षा सुनावणार असतात.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, “‘बिग बॉस’ म्हणाले, “आर्या व निक्कीमध्ये जे काही घडलं ते अतिशय निंदनीय आहे आणि ‘बिग बॉस’ याप्रकरणी आर्या यांना कठोर शिक्षा सुनावणार आहे”. आता आर्याला या प्रकरणी काय शिक्षा होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलेलं आहे. याशिवाय निक्कीने “एकतर आर्याला घराबाहेर काढा नाहीतर मी बाहेर जाते” अशी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.