‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता राडे सुरु झाले आहेत. कॅप्टन्सी टास्कमध्ये ‘जादुई हिरा’ मिळवण्याचा टास्क सुरु होता या टास्कदरम्यान आर्या आणि निक्कीमध्ये मोठी झटापट झालेली पाहायला मिळाली. दरम्यान भडकलेल्या आर्याने निक्कीच्या कानशिलात वाजवल्याची घटना ‘बिग बॉस’च्या घरात घडली आहे. त्यामुळे निक्कीच्या गैरवागणुकीची तिला शिक्षा मिळाली आहे, असं सदस्यांचं म्हणणं आहे. निक्कीचा सर्वच गोष्टींमध्ये मध्ये मध्ये करणं आता साऱ्यांना खटकत आहे. आणि या तिच्या स्वभावामुळे स्पर्धकांना आर्याचा अनावर झालेला राग योग्य वाटत असल्याचं दिसत आहे. (Bigg Boss Marathi Season 5)
‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता जान्हवी व निक्कीमध्येही फिस्कटलं असल्याचं दिसत आहे. जान्हवीने निक्कीबरोबर न खेळता तिच्या विरोधात खेळायचा निर्णय घेतला आहे. निक्की व अरबाज एकत्र खेळताना दिसत आहेत. दरम्यान, जान्हवीने कॅप्टन्सीमधून अरबाजला बाहेर करत तिचा गेम दाखवून दिला. कारण निक्कीनेही याआधी जान्हवी कॅप्टन होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले आणि तिचं हे वागणं जान्हवीला खटकलं. आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवीचा राग अनावर झालेला पाहायला मिळत असून ती टीम बी कडे निक्की विरोधात बोलताना दिसत आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, जान्हवी म्हणते, “ट्रॉफी मिळो ना मिळो पण हिचा गर्व उतरवायचा आहे”. यावर पॅडी म्हणतात, “हो तो उतरलाच आहे. तिकडे तू बघायला हवं होतंस ती हताश झाली होती”. यावर जान्हवीही म्हणते, “ती हतबल झाली आहे”. पॅडी धनंजयला बोलतात, “बाहेर गेलास की आवर्जून हे पाहा”. यावर धनंजय बोलतो, आता काय बोलू नका हसू येतंय”. अंकिता यावर बोलते, “आम्ही उलट तिला सांगत होतो, फुटेज देऊ नकोस आम्हाला. आम्हाला तुझं फुटेज नको आहे प्लिज निक्की बाहेर जा”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : चुकीला माफी नाही! निक्कीच्या कानाखाली मारणं आर्याला पडणार महागात, घराबाहेर काढणार का?
यावर धनंजय म्हणतो, “कधी नाय ते कॅप्टन्सी येईल असं वाटत होतं त्यात हे राडे करुन बसलेत”. यावर पॅडी म्हणतात, “हातातोंडाशी आलेलं गेलं”. यावर अंकिता म्हणते, “आता कॅप्टन होणं आणि इम्युनिटी मिळेपर्यंत नाका तोंडात पाणी जाईल, त्यापेक्षा स्विमिंग पूलमध्ये चार उड्या मारेल”.