काही महिन्यांपूर्वीच रुबिना दिलैकने जुळ्या मुलींना जन्म दिला. रुबिना आई होताच तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. आई झाल्यानंतर तिने आपला सगळा वेळ आपल्या दोन्ही मुलींसाठी दिला आणि आता काही काळापूर्वी ती कामावर परतली. दरम्यान, रुबिना दिलैकला आता फक्त ‘भाभी’ची भूमिका मिळत आहे, ज्याबद्दल अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या पॉडकास्टमध्ये खुलासा केला आहे. रुबिना दिलैकने अभिनेता शरद केळकरला तिच्या पॉडकास्टच्या नवीन सीझनसाठी आमंत्रित केले. यामध्ये तिने आई झाल्यानंतर कुटुंब व कामाचे आयुष्य संतुलित करण्याविषयी सांगितले. (Rubina Dilaik Statement)
संवादादरम्यान शरद केळकर यांनी रुबिना दिलैकच्या फिटनेसचे कौतुक केले. तेव्हा अभिनेत्री म्हणाली, “आता मला ‘भाभी’च्या भूमिका मिळत आहेत”. अशी माहिती आहे की आई होण्यापूर्वी रुबिना दिलैक टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिका साकारत होती. मात्र आता आई झाल्यानंतर अभिनेत्रीला सह कलाकराच्या भूमिका मिळत आहेत. रुबिना दिलैक ‘शक्ती: अस्तित्व के एहसास की’ ते ‘छोटी बहू’ आणि ‘सास बिना ससुराल’ सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.
आणखी वाचा – “मी आजारी आहे आणि…”, मृत्यूपूर्वी मलायकाच्या वडिलांनी लेकींना सांगितली होती ‘ही’ गोष्ट, सूत्रांचा दावा
रुबिना ‘बिग बॉस १४’ ची विजेती होती आणि अनेक रिॲलिटी शोमध्येही दिसली होती. पण आई झाल्यानंतर परिस्थिती बदलली आणि मुख्य भूमिका मिळत नाही अशी तक्रार अभिनेत्रीने केली. रुबिना काही चित्रपटांचा भागही आहे. ती लवकरच ‘हम तुम और मक्तूब’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे शूटिंग सुरु आहे.
नुकतेच रुबिनाच्या घरी गणपती बाप्पा उपस्थित होते आणि तिने पूर्ण भक्तिभावाने पूजा केली. तिने दीड दिवस बाप्पाला घरी आणले होते आणि नंतर विसर्जन केले. विसर्जनानंतर, रुबिना हिमाचल प्रदेशातील तिच्या घरी परतली, जिथे तिने पती अभिनव शुक्ला यांच्याकडे जीवा व एधा या मुलींना सोडलं. कामावर परतल्यानंतर रुबिनाही आपल्या मुलींची विशेष काळजी घेत आहे. ती आणि अभिनव शुक्ला एकमेकांच्या अनुपस्थितीत त्यांच्या मुलींची काळजी घेतात.