Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale : ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व हे यंदा खूप गाजलं. यंदाच्या या पर्वाच्या ‘बिग बॉस’ची ट्रॉफी सूरज चव्हाणने जिंकली आणि अभिजीत सावंत उपविजेता ठरला. ‘जेंटलमन’ अशी ओळख मिळालेला अभिजीत सावंत टॉप २ मध्ये पोहोचला, पण हा शो जिंकण्यापासून तो वंचित राहिला. सूरज चव्हाण जिंकल्यावरही अभिजीतने आनंद व्यक्त केला. या ‘बिग बॉस मराठी’ ५ चा उपविजेता अभिजीत सावंतचा आज वाढदिवस आहे, शोचा ग्रँड फिनाले झाल्यानंतर त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन अगदी दणक्यात करण्यात आलं. त्याने कुटुंबाबरोबरच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे.
शिवाय, ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतरही अभिजीतचं घरी जंगी स्वागत करण्यात आलं. फटाक्यांची आतिषबाजी करत अगदी धुमधडाक्यात त्याचं स्वागत करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. शिवाय ढोल-ताशाच्या गजरात त्याचं स्वागत झालं. मित्र परिवाराने त्यांचं जंगी स्वागत केलं. त्या भेटताच त्याच्या मित्रांनी घट्ट अशी मिठी मारली. त्यानंतर अभिजीतच्या आईने त्याला गोड खाऊ घालत त्याला मिठी मारली. यावेळी लेकाला पाहून त्याच्या आईचाही आनंद गगनात मावेनासा झालेला पाहायला मिळाला. मित्रपरिवार, कुटुंबीय, शेजारी येत अभिजितचं कौतुक करताना दिसले.
अभिजीतने कुटुंबाबरोबरच्या त्याच्या वाढदिवसाच्या जंगी सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. पत्नी शिल्पा व दोन्ही मुलींबरोबर वाढदिवस साजरा केला. त्याने व्हिडीओ शेअर करून त्याला बिग बॉसच्या प्रवासात पाठिंबा देणाऱ्यांचे तसेच हा शो पूर्ण बघणाऱ्यांचे आभार मानले आहेत. “ज्यांनी ज्यांनी मला मतदान केलं, ज्यांनी ज्यांनी ‘बिग बॉस मराठी’ हा शो बघितला, त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. आज माझा वाढदिवस असून मी तो माझं कुटुंब आणि मित्रपरिवाराबरोबर साजरा करत आहे”, असं त्याने व्हिडीओमध्ये म्हटलं.
आणखी वाचा – बारामतीमधील गावात सूरज चव्हाण असं जगतो आयुष्य, मजुरी करुन भरलं पोट, फक्त आठवी पर्यंत शिक्षण अन्…
अभिजीतच्या अनेक चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातीलही अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘बिग बॉस मराठी ५’चा महाविजेता सूरज चव्हाण ठरला असून या शोच्या उपविजेतेपदाचा बहुमान गायक अभिजीत सावंतला मिळाला आहे. अभिजीतच्या या पोस्टवर कमेंट्स करुन चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.