शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“जे बरोबर वाटलं तेच केलं आणि…”, ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यावर जान्हवी किल्लेकरची पहिली पोस्ट, म्हणाली, “killergirl म्हणून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 6, 2024 | 8:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale jahnavi killekar first post

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर येताच जान्हवीची पहिली लक्षवेधी पोस्ट

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale : ‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा अगदी रंगतदार सुरु असलेला पाहायला मिळाला. यंदाच्या या पर्वात प्रत्येक स्पर्धकाने आपलं कौशल्य दाखवत चुरशीची लढत केलेली पाहायला मिळाली. यंदाच्या या पर्वात सगळे स्पर्धक उत्तम खेळ खेळताना दिसले. दरम्यान या पर्वात विशेष चर्चेत राहिलेली टास्क क्वीन म्हणजेच जान्हवी किल्लेकर. जान्हवी किल्लेकरचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील हा प्रवास वाखाणण्याजोगा होता. सुरुवातीला अनेक चुका करत त्या चुकांचं प्रायश्चित्त घेत जान्हवीने ‘बिग बॉस’च्या घरात उत्तम प्रवास केला. यामुळे तिचं भाऊच्या धक्क्यावर कौतुकही झालेल पाहायला मिळालं.

‘बिग बॉस मराठी’च्या घराततील जान्हवी किल्लेकरचा प्रवास संपताच तिने तब्बल नऊ लाख रुपयांची प्राइज मनी घेत ‘बिग बॉस’च्या घरातील हा प्रवास संपवला. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर जान्हवीने शेअर केलेल्या तिच्या पहिल्या इन्स्टाग्राम पोस्टने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. जान्हवीने पोस्ट शेअर करत तिच्या फोटोसह असं म्हटलं की, ‘बिग बॉस’च्या घरात जाताना मी #killergirl म्हणून गेली होती आणि आता या ७० दिवसाच्या प्रवासानंतर तुम्ही सगळ्यांनी मला #taskqueen म्हणून इतकं प्रेम दिलंत त्यासाठी धन्यवाद”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale : नऊ लाख प्राइझ मनी घेऊन जान्हवी किल्लेकर घराबाहेर, ‘बिग बॉस मराठी’ला मिळाले टॉप ५ सदस्य

View this post on Instagram

A post shared by Jahnavi Kiran Killekar (@jahnavikillekar)

याशिवाय जान्हवीने या पोस्टला कॅप्शन देत असे म्हटले आहे की, “‘बिग बॉस’चा खेळ या टप्प्यावर खूपच कठीण झाला होता. त्यात मला त्यावेळी जे बरोबर वाटलं ते मी केलं. तुमची सगळ्यांनी माझी आजपर्यंत इतकी साथ दिली त्यासाठी तुम्हा सगळ्यांची मी खूप खूप मनापासून आभारी आहे. जाता जाता ही #taskqueen चा किताब घेऊनच बाहेर आली. परत एकदा मनापासून धन्यवाद”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale : ‘बिग बॉस मराठी’ मधून डीपी बाहेर, अभिजीत, सूरज व निक्की ठरले टॉप तीन सदस्य

जान्हवीने ‘बिग बॉस’च्या घरात उत्तम टास्क करत प्रेक्षकांची मन जिंकली. शिवाय जान्हवीच्या चाहत्यांनी तिला भरभरुन पाठिंबाही दिसला. आता या घरातून जान्हवीने निरोप घेतलेला पाहायला मिळत आहे. जान्हवीने आजवर अनेक मालिका विश्वातून खलनायिकाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यानंतर जान्हवीने ‘बिग बॉस’मध्ये ही चांगलाच धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला.

Tags: Bigg Boss Marathi Season 5 Grand Finalejahnavi killekar exitjahnavi killekar post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner

ट्रॉफी बारामतीतच! Bigg Boss Marathi 5 चा विजेता ठरला सूरज चव्हाण, मिळाले इतके लाख रुपये, बक्षिसांचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.