Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale : ‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा अगदी रंगतदार सुरु असलेला पाहायला मिळाला. यंदाच्या या पर्वात प्रत्येक स्पर्धकाने आपलं कौशल्य दाखवत चुरशीची लढत केलेली पाहायला मिळाली. यंदाच्या या पर्वात सगळे स्पर्धक उत्तम खेळ खेळताना दिसले. दरम्यान या पर्वात विशेष चर्चेत राहिलेली टास्क क्वीन म्हणजेच जान्हवी किल्लेकर. जान्हवी किल्लेकरचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील हा प्रवास वाखाणण्याजोगा होता. सुरुवातीला अनेक चुका करत त्या चुकांचं प्रायश्चित्त घेत जान्हवीने ‘बिग बॉस’च्या घरात उत्तम प्रवास केला. यामुळे तिचं भाऊच्या धक्क्यावर कौतुकही झालेल पाहायला मिळालं.
‘बिग बॉस मराठी’च्या घराततील जान्हवी किल्लेकरचा प्रवास संपताच तिने तब्बल नऊ लाख रुपयांची प्राइज मनी घेत ‘बिग बॉस’च्या घरातील हा प्रवास संपवला. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर जान्हवीने शेअर केलेल्या तिच्या पहिल्या इन्स्टाग्राम पोस्टने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. जान्हवीने पोस्ट शेअर करत तिच्या फोटोसह असं म्हटलं की, ‘बिग बॉस’च्या घरात जाताना मी #killergirl म्हणून गेली होती आणि आता या ७० दिवसाच्या प्रवासानंतर तुम्ही सगळ्यांनी मला #taskqueen म्हणून इतकं प्रेम दिलंत त्यासाठी धन्यवाद”.
याशिवाय जान्हवीने या पोस्टला कॅप्शन देत असे म्हटले आहे की, “‘बिग बॉस’चा खेळ या टप्प्यावर खूपच कठीण झाला होता. त्यात मला त्यावेळी जे बरोबर वाटलं ते मी केलं. तुमची सगळ्यांनी माझी आजपर्यंत इतकी साथ दिली त्यासाठी तुम्हा सगळ्यांची मी खूप खूप मनापासून आभारी आहे. जाता जाता ही #taskqueen चा किताब घेऊनच बाहेर आली. परत एकदा मनापासून धन्यवाद”.
जान्हवीने ‘बिग बॉस’च्या घरात उत्तम टास्क करत प्रेक्षकांची मन जिंकली. शिवाय जान्हवीच्या चाहत्यांनी तिला भरभरुन पाठिंबाही दिसला. आता या घरातून जान्हवीने निरोप घेतलेला पाहायला मिळत आहे. जान्हवीने आजवर अनेक मालिका विश्वातून खलनायिकाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यानंतर जान्हवीने ‘बिग बॉस’मध्ये ही चांगलाच धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला.