‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व विशेष गाजताना दिसत आहे. यंदाच्या या पाचव्या पर्वात एका स्पर्धकाची विशेष चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. हा स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यावर सूरजने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. अगदी आहे तसा, आहे त्या कपड्यांमध्ये सूरजने ‘बिग बॉस’मध्ये एंट्री घेतली. त्यानंतर सूरजला अर्बन ब्रँडने पाठिंबा देत डिझाइनरच्या मदतीने कपडे तसेच त्याला लागणार साहित्य पुरवायला सुरवात केली. सूरजच्या आऊटफिटबाबत नुकतीच त्याच्या डिझाइनरची आणि ब्रँडच्या डिरेक्टरची इट्स मज्जाने मुलाखत घेतली. (Suraj Chavan Outfit)
यावेळी सूरजची डिझाइनर सूरजच्या आऊटफिटबद्दल बोलताना असं म्हणाली की, “सूरज चांगला कसा दिसेल याबाबत आमची नेहमीच चर्चा सुरु असायची. सुरुवातीला आमच्याकडे त्याच्या कपड्यांचं मापही नव्हतं. तो ‘बिग बॉस’च्या घरात असल्याने त्याच्या शर्टच्या साईजवर आम्ही त्याचे कपडे बनवले. सूरजचे कपडे पाहून त्याला चांगल्या कमेंट्स येऊ लागल्या, त्यामुळे आमची जबाबदारी अधिक वाढली”. “सर्व स्पर्धकांकडून कपडे पुन्हा घेतले जातात पण सूरजकडून नाही”.
याबाबत अर्बन ब्रँडच्या डिरेक्टरला प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, “आमचा मराठी ब्रँड आहे. आम्ही सुद्धा गरीब परिस्थितीतून वर आलो आहोत. आज सूरजची परिस्थिती पाहता आम्ही सुद्धा त्याच्यासारखेच तळागाळातून वर आलो आहोत. त्यामुळे करायचं तर चांगलं करायचं नाहीतर नाही. आमच्याकडून जाणारा प्रोडक्ट हा लेबल म्हणून न जाता तो त्यावर चांगला दिसेल का या हेतूने जातो. तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यांमध्ये सूरजचे आऊटफिट उठून दिसतात आणि ते कपडे सूरजलाच आम्ही दिले आहेत”. “सूरज डिझाइनरच्या संकल्पनेनुसार ते कपडे कॅरी करतो का?”, असा प्रश्न विचारला असता डिझाइनर सोमय्या म्हणाली, “त्याला याबाबत काहीच सांगितलं नाही. त्याला जसं ते घालायचं अगदी तसं आम्ही त्याला सेट करुन देतो. त्यामुळे त्याला ते कॅरी करणं सोप्प जातं”.
आणखी वाचा – संग्रामवर मोठी शस्त्रक्रिया, Bigg Boss च्या घरात झालेल्या दुखापतीमुळे रुग्णालयात भरती, दाखवली सत्य परिस्थिती
“त्याचे कपडे डिझाईन करताना कोणते मुद्दे लक्षात घेतले जातात”, याबाबत बोलताना डिझाइनर म्हणाली की, “आता मी जे कपडे डिझाईन करते ती माझी स्टाईल नसून त्याची स्टाईल म्हणून ओळखली जावी असं मला वाटतं. त्याची गोलीगत स्टाईल, त्याचे डायलॉग, त्याला कोणता रंग चांगला वाटतो या सगळ्याचा विचार कपडे डिझाईन करताना आम्ही करतो. सूरजने ट्रॉफी जिंकावी असं मनापासून वाटतंय त्यावेळी त्याने घातलेल्या आऊटफिटची चर्चा नक्की होईल याची मी खात्री देते”.