Anurag Dobhal news : प्रसिद्ध यूट्यूबर आणि ‘बिग बॉस १७’ स्पर्धक अनुराग डोभाल काही काळापूर्वी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत होता. अपघातामुळे त्याचं वैयक्तिक आयुष्य विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं अशातच आता अनुरागच्या आयुष्यात सुखाचे क्षण आले आहेत. अनुराग डोभाल वडील झाले आहेत. त्याची पत्नी रितिका हिने नुकतेच पहिल्या मुलाला जन्म दिला आहे. खुद्द रितिकाने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने सोशल मीडियावर बाळाचा एक सुंदर फोटोही शेअर केला आहे. अनुराग डोभालची पत्नी रितिका हिने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये बाळाचे पाय दिसत आहेत. फोटो शेअर करत रितिकाने लिहिले की, “रामनवमीच्या निमित्ताने देवाने आम्हाला एक सुंदर भेट दिली आहे”. रितिकाने 27.3.2026 तारीख देखील शेअर केली आहे. सध्या तरी मुलाचे लिंग आणि नाव समोर आलेले नाही.
त्याच वेळी, अनुराग डोभाल यांनी नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते रुग्णालयातून घरी परतत असताना कारमधून खाली उतरताच आपल्या मुलाला आपल्या मांडीवर घेताना दिसत आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “माझ्या मुलासाठी दुसरा जन्म”. अनुराग डोभालने ३० एप्रिल २०२५ रोजी त्यांच्या प्रदीर्घ काळातील गर्लफ्रेंड रितिका चौहानसोबत विवाह केला. या जोडप्याने आता त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले आहे.

आणखी वाचा – वरुण धवनच्या दीड वर्षीय मुलीला झालेला गंभीर आजार, लेकीबाबत पहिल्यांदाच बोलला, म्हणाला, “वाकडं चालायची…”
काही काळापूर्वी अनुराग डोभाल त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होता. व्हिडीओ शेअर करून अनुरागने आई-वडील आणि भावावर आरोप केले होते आणि त्यांनी अनुरागला त्यांच्या आयुष्यातून आणि घरातून काढून टाकल्याचे सांगितले होते. एवढेच नाही तर त्याची पत्नी रितिकाही त्याच्यासोबत नसल्याचेही त्याने सांगितले. या सर्व प्रकारामुळे अनुरागने इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन आत्महत्येचा प्रयत्नही केला आणि याच दरम्यान त्याचा अपघातही झाला. मात्र, आता तो इस्पितळात दाखल आहे आणि त्याच्या तब्येतीची माहिती सोशल मीडियावर चाहत्यांशी शेअर करत आहे.





