शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आणखी एक लोकप्रिय मालिका घेणार निरोप?, झी मराठी वाहिनीचा मोठा निर्णय, पोस्ट शेअर केली अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 28, 2026 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Zee Marathi Serial Update

झी मराठी वाहिनीचा मोठा निर्णय,

Zee Marathi Serial Update : सध्या अनेक नव्या मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. यादरम्यान ‘झी मराठी’ वाहिनीवर देखील ‘दीपज्योती’ ही नवीन मालिका प्रसारित होणार आहे. येत्या १३ एप्रिलपासून ही मालिका ऑन एअर होणार आहे. तर यामध्ये या अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि अभिनेता प्रसाद जवादे यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. ‘दीपज्योती’ ही मालिका रात्री आठ वाजताच्या प्राइम स्लॉटला प्रसारित केली जाणार आहे. तर सध्या या टाइम स्लॉटमध्ये आठ वाजता ‘लक्ष्मीनिवास’ मालिका ऑन एअर होते. गेल्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं. आता ही नवीन मालिका येणार असल्यामुळे ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेचं काय होणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.

आणखी वाचा: मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात विवाहसोहळा संपन्न; लुकने वेधलं लक्ष, फोटो समोर

दरम्यान अनेक चाहत्यांनी मालिका संपवू नका अशा कंमेंट केल्या होत्या. तर ‘झी मराठी’न वाहिनीने स्वतः पोस्ट शेअर करत याबद्दल अपडेट शेअर केली आहे. तर ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका संपणार नसून नव्या वेळेत प्रेक्षकांच्या वेळेत येणार आहे. तर यासोबतच आणखी एक मालिकेच्या वेळेत बदल होणार आहे. सावळ्याची जणू सावली ही मालिकेचे देखील नव्या वेळेत प्रसारित होणार आहे. ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ या दोन्ही मालिका आता एका नव्या वेळेत प्रसारित केल्या जातील. दोन्ही मालिकांची नवीन वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल. (Zee Marathi Serial Update)

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

प्रेक्षकांनी या पोस्टच्या कमेंट्समध्ये या मालिकांचे नवीन टाइम स्लॉट काय असतील याचाही अंदाज लावला आहे. ‘लक्ष्मी निवास’ ६:३० वाजता तर ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची वेळ ६ वाजताची करतील असं अनेकांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. तर, काही नेटकऱ्यांनी सावळ्याची जणू सावली ही आता दुपारी ऑन एअर होईल असंही वाटतंय. लवकरच ‘झी मराठी’कडून या दोन्ही मालिकांची नवीन वेळ काय असेल हे जाहीर केलं जाईल. (Zee Marathi Serial Update)

आणखी वाचा: ‘त्याला कोणतंच मत नाही’ यावर ट्रोल झालेला स्पर्धक अखेर घराबाहेर, सात सदस्यांपैकी ‘या’ स्पर्धकाची exit, चाहत्यांना धक्का

Tags: entertainmentlaxmi niwassavlaychi janu savaliZee Marathi Serial Update
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Varun Dhawan Daughter

वरुण धवनच्या दीड वर्षीय मुलीला झालेला गंभीर आजार, लेकीबाबत पहिल्यांदाच बोलला, म्हणाला, "वाकडं चालायची…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.