शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : ड्युटीवरुन अंकिता व अभिजीतमध्ये वादाची ठिणगी, टीम बी मधून एक्झिट घेणार का?, डीपीचाही आवाज चढला

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 30, 2024 | 9:54 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Season 5 ankita and abhijeet fight

घरातील ड्युटीवरुन सुरु झालाय अंकिता आणि अभिजीत मध्ये वाद

Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस’ म्हटलं की वाद हा आलाच. ‘बिग बॉस मराठी’चं घर हे वादासाठी ओळखलं जातं. सध्या ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सुरु आहे. या पर्वातील स्पर्धकांनी हे पर्व विशेष गाजवलं आहे. टीआरपीच्या शर्यतीतही हे पर्व विशेष पुढे असलेलं दिसलं. ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. हे पर्व १०० दिवसांचे नसून आता ७० दिवसांचे असणार आहे. लवकरच या पर्वाचा शेवट होणार असून यंदा कोणता स्पर्धक बाजी मारणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत. दरम्यान, स्पर्धकांचा फिनाले वीक पर्यंतचा प्रवास सुरु झाला आहे. गेले नऊ आठवडे स्पर्धकांनी अक्षरशः धुमाकूळ घालत हा प्रवास पूर्ण केलेला पाहायला मिळत आहे.

अगदी पहिल्या आठवड्यापासून ‘बिग बॉस’च्या या घरात राडे होताना पाहायला मिळाले. तर आता फिनाले वीक असूनही स्पर्धक मंडळी भांडण करणं काही सोडत नाहीत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, टीम बी मधील अंकिता वालावलकर व अभिजीत सावंत यांच्यात वाद झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी पहिल्या दिवसापासून अंकिता व अभिजीत एकत्र खेळताना दिसले. टीम बी मधून दोघे खेळताना दिसले आणि त्यांच्यात चांगली मैत्री पाहायला मिळाली. अनेकदा वाद होऊनही ते एकत्र दिसले. मात्र काही दिवसांपासून अभिजीत हा टीम बी पासून दूर राहताना दिसला.

आणखी वाचा – फिनाले वीकपर्यंत पोहोचले ‘बिग बॉस”च्या घरातील सात स्पर्धक, ट्रॉफीवर कोण नाव कोरणार?, उत्सुकता वाढली

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

समोर आलेल्या प्रोमोमध्ये अंकिता व अभिजीत यांच्यात ड्युटीवरुन भांडण झालेलं पाहायला मिळत आहे. अंकिता अभिजीतला म्हणते, “हिला डायनिंग टेबल देऊन तू संपूर्ण बाथरुमची जबाबदारी तू स्वतःवर घेत आहेस?”. यावर अभिजीत अंकिताला म्हणतो, “तुला जर वाटत असेल तर तू तिला बोल”. यावर अंकिता म्हणते, “सगळीकडे तू gentlemen म्हणून येतोस आता इथे पण ये”. यावर अभिजीत म्हणतो, “मी माझ्या ड्युटी माझ्या सुविधेप्रमाणे घेतो. त्यात माझी काय चूक आहे?”. यावर अंकिताचा पारा चढतो, तर डीपीही अभिजीतवर भडकतो, आणि “तू कोणाला सांगतोयस?”, असं अभिजीतला विचारतो.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातून पॅडी कांबळेची एक्झिट, फिनालेपूर्वी संधी हुकल्याने नाराजी, अश्रू अनावर

कालच्या नॉमिनेशन मधून पॅडी कांबळे यांना घराबाहेर पडावं लागलं. त्यामुळे टीम बी मधील एक स्पर्धक कमी झाला. आता अभिजीत व अंकिता यांच्या भांडणानंतर अभिजीत शेवटच्या आठवड्यात टीम बी मधून माघार घेणार का?, हा वाद कुठवर जाणार हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: ankita and abhijeet fightbigg boss marathi promobigg boss marathi season 5
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
bigg boss marathi season 5 riteish deshmukh bhaucha dhakka

दोन आठवडे रितेश देशमुखचा भाऊचा धक्का झालाच नाही, पण यामागचं नेमकं कारण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.