बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “माझ्यामुळेच तुला शिक्षा झाली”, जान्हवीच्या ‘त्या’ वक्तव्यानंतरही पॅडींनी का घेतली तिची बाजू?, म्हणाले, “मलाच वाईट वाटतं कारण…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 28, 2024 | 11:31 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Paddy aka Pandharinath Kamble feels bad for Janhvi Killekar punishment in the house

Bigg Boss Marathi 5 च्या घरात जान्हवीला मिळालेल्या शिक्षेसाठी पॅडी कांबळेंना वाटतंय वाईट, त्यांच्यामुळे तिच्यावर ही वेळ आली असल्याची दिली कबुली

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठीच्या घरात ‘सत्याचा पंचनामा’ टास्कदरम्यान पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी दादा यांच्याशी बोलताना जान्हवी किल्लेकरची जीभ घसरली होती. टास्कदरम्यान, सुरुवातीला निक्कीने पॅडी दादांना ‘जोकर’ म्हटलं होतं. तर, जान्हवीने त्यांच्या कारकिर्दीचा व अभिनयाचा अपमान केला होता. जान्हवीच्या या घाणेरड्या वक्तव्यामुळे प्रेक्षकांमध्ये आणि कलाकारांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं. विशाखा सुभेदार, सुरेखा कुडची, अभिजीत केळकर, सिद्धार्थ जाधव त्याचबरोबर पॅडी दादांची मुलगी ग्रीष्मा या सर्वांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जान्हवीला चांगलंच धारेवर धरलं होतं. पॅडी दादांचा अपमान केल्यामुळे ‘भाऊचा धक्का’वर रितेश देशमुखने तिला शिक्षाही सुनावली. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)

‘भाऊचा धक्का’वर रितेशने जान्हवीला जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली. तेव्हापासून अभिनेत्री जेलमध्ये आहे. जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिल्यामुळे जान्हवीला घरात कुठेही फिरणे बंधनकारक झालं आहे. तसंच तिला घरातील सर्व सुखसोयींचा लाभही घेता येत नाहीये. त्यामुळे याबद्दल जान्हवीला आता वाईट वाटत असून याबद्दल तिने कालच्या भागात माफीही मागीतली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या भागात सूरज व घन:श्याम जान्हवीच्या इथे बसलेले असताना तिथे पॅडी येतात. तेव्हा घन:श्याम माझा जोडीदार आला असं म्हणतो. यावर पॅडी कांबळे “तू बस इथे मला काही प्रॉब्लेम नाही” असं म्हणतात.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात नात्यांची समीकरणे बदलणार, कोणाला मिळणार प्रेमात ठोकर आणि कोणाला होणार पश्चात्ताप?

यापुढे पॅडी “मला तिच्याबरोबर बसता येत नाही” असं म्हणतात, यावर जान्हवी त्यांना “का काय झालं?” असं विचारते. यावर पॅडी असं म्हणतात की, “तू माझ्यामुळे इथे आहेस. यामुळे मला खूप वाईट वाटत आहे आणि त्यामुळे मला इथे तुझ्याबरोबर बसायला अवघडल्यासारखे वाटत आहे”. यावर जान्हवी असं म्हणते की, “असं अजिबात नाही, मला माझ्या चुकीची शिक्षा मिळाली असून मला ही शिक्षा भोगू द्या. मला माहीत आहे तुम्हाला वाईट वाटत आहे. पण माझ्या चुकीमुळे मी इथे आहे आणि मला मिळालेली ही शिक्षा मी पूर्ण भोगणार आहे. माझ्या चांगल्यासाठी ही शिक्षा मिळाली असून सरांनी दिलेली ही शिक्षा योग्यच आहे”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातील ‘डोकं नसलेले’ व ‘फक्त भटकणारे’ हे चार स्पर्धक झाले नॉमिनेट, या आठडव्यात कुणाचा पत्ता कट होणार?

दरम्यान, याआधी एकदा जान्हवीने स्वतः जाऊन त्यांची माफी मागितली होती आणि तेव्हा पॅडी यांनी तिला माफही केलं होतं. मात्र जान्हवीने केलेली चूक खूप मोठी असून तिला या चुकीसाठी जेलमध्ये राहण्याची शिक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे आता ती या शिक्षेतून कधी मुक्त होणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर  आहेत.   

Tags: bigg boss marathi 5janhavi killekarPandharinath Kamble
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
dhananjay powar mother and wife on Bigg Boss Marathi 5

"काय भानगड आहे?, त्याला कॅमेऱ्यात दाखवत नाहीत", धनंजय पोवारच्या बायको व आईचा Bigg Boss ला थेट प्रश्न, म्हणाल्या, "पटलं नाही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.