Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाला चांगलीच रंगत येत असून या शोला आता जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे. दिवसेंदिवस या घरातील स्पर्धकांचे रंग आता समोर येत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्याच दिवसापासून प्रेमाची वारे वाहू लागले होते. मात्र, आता जस-जसे दिवस पुढे जात आहेत, तसे सर्व सदस्यांचे खरे चेहरे समोर यायला लागले आहेत. अशातच ‘बिग बॉस’च्या पाचव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच नॉमिनेशन टास्क सुरू झाला आहे. या नॉमिनेशनसाठी मानकापाचा टास्क ठेवण्यात आला होता. मानकाप्यापासून वाचण्यासाठी स्पर्धकांना संपूर्ण आठवडाभर ‘बिग बॉस’ यांनी नेमून दिलेल्या जोडीनेच फिरायचं आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
‘बिग बॉस’ यांनी निक्की-अभिजित, अरबाज-आर्या, जान्हवी-सूरज, वैभव-धनजंय, अंकिता-वर्षा, पंढरीनाथ-घनःश्याम अशा जोड्या तयार करण्यात आल्या. यात घरातील स्पर्धकांनी जोडीला नॉमिनेट करायचे होते. यावेळी घरातील सर्व स्पर्धकांनी त्यांचे या घरात राहण्याचे योग्य कारण देत इतर स्पर्धकांना नॉमिनेट केले आहे आणि या नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील एकूण चार स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. अंकिता वालावलकर, वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत व या घरचीआताची कॅप्टन निक्की तांबोळी हे चार स्पर्धक घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत आहेत.
यावेळी डीपीने अभिजीत व निक्की यांना सुरक्षित करत पॅडी व घन:श्याम यांना नॉमिनेट केलं. त्यानंतर वर्षाताईंनी पॅडी व घन:श्याम यांना सुरक्षित करत वैभव व डीपी यांना नॉमिनेट केलं. त्यानंतर सूरजने या दोघांना सुरक्षित करत आर्या व अरबाज यांना नॉमिनेट केलं. पॅडी कांबळे यांनी आर्या व अरबाज यांना सुरक्षित करत वैभव व डीपी यांना नॉमिनेट केलं. यानंतर आर्याने या घरात राहण्यासाठी डीपी व वैभव यांच्याऐवजी घन:श्यामव पॅडी यांना नॉमिनेट करते. पुढे अरबाज वैभव डीपी यांना सुरक्षित करत अंकिता व वर्षा यांना नॉमिनेट करतो. मग पुढे वैभव येऊन पॅडी व घन:श्याम यांना सुरक्षित करत निक्की व अभिजीत यांना नॉमिनेट करतो.
आणखी वाचा – Suhasini Deshpande Death : मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा, ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन
यामुळे नॉमिनेशनसाठी निक्की-अभिजीत व अंकिता-वर्षा या दोन जोड्या नॉमिनेट होतो. पुढे या टास्कसाठी अभिजीत येतो व तो अंकिता व वर्षा यांच्याऐवजी वैभव व डीपी यांना नॉमिनेट करतो. त्यानंतर घन:श्याम येतो व सर्व सूत्र हलतात. घन:श्याम या टास्कमध्ये वैभव व डीपी यांचा खेळ चांगला असल्याचे म्हणत त्यांना सुरक्षित करतो आणि त्यांच्याऐवजी पुन्हा वर्षा व अंकिता यांना नॉमिनेट करतो. त्यामुळे आता या आठवड्यात नक्की कोण घराबाहेर जाणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे.