शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हिने एका मराठी कलाकाराची जागा घेतली”, इरीना रुडाकोवावर अंकिता वालावलकरची टीका, म्हणाली, “मराठी शो असताना…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 30, 2024 | 12:42 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Updates

"हिने एका मराठी कलाकाराची जागा घेतली", इरीना रुडाकोवावर अंकिता वालावलकरची टीका, म्हणाली, "मराठी शो असताना…"

‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रम मराठी कार्यक्रम असल्याने यांत मराठी कलाकारांना प्राधान्य दिलं पाहिजे या मताचे अनेकजण आहेत. दरम्यान, यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’ या नव्या पर्वात इरिना रूडाकोवा या परदेसी गर्लची एण्ट्री अनेकांना खटकलेली आहे. या परदेसी पाहुणीने ‘बिग बॉस मराठी ५’ च्या रंगमंचावर एण्ट्री करत अफलातून परफॉर्मन्ससुद्धा केला. घरातही इरिना सगळ्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करताना दिसली. विशेष बाब म्हणजे तिने मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत प्रेक्षकांची मनं जिंकली. (Bigg Boss Marathi 5 Updates)

इरिना ही मूळची मराठी नसल्याने तिच्यासाठी हा खूप मोठा टास्क आहे. या रिऍलिटी टीव्ही शोमध्ये पदार्पण करत इरिना, बिग बॉसच्या कसोटीचा सामना कशाप्रकारे करेल याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अनेकजण इरिनाला सपोर्ट करताना दिसत आहेत. तर काहींना इरिनाची एण्ट्री खटकली आहे. खुद्द ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकालाचं इरिना या शोसाठी पात्र नाही असं वाटत आहे. याचा खुलासाही ‘बिग बॉस’च्या घरात झाला.

आणखी वाचा – सूरज चव्हाणची एका दिवसाची कमाई ऐकून सेलिब्रिटींनाही धक्का, कमावतो तब्बल…; म्हणाला, “आधी मला खूप लोकांनी लुटलं अन्…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

इरिना ऐवजी ‘बिग बॉस’च्या घरात आणखी कोणा एका मराठी कलाकाराला घ्यायला हवं होतं असं कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिचं म्हणणं आहे. याबाबत ती बोलताना असं म्हणाली की, “पहिलाच दिवस आहे त्यामुळे काही बोलायला नको. सगळेच इंग्रजी भाषेमधून तिच्याशी संवाद साधत आहेत. मराठी शिकवण्यासाठी तिला इथे पाठवलं असेल. तिला आम्ही मराठी शिकवावं असा उद्देश असणार. मला भाषेविषयी अडचण नाही. सगळ्यांना सगळ्या भाषा आल्याच पाहिजे. पण जेव्हा आपण मराठी शो म्हणतो तेव्हा एका मराठी कलाकाराची जागा गेली असं मला वाटतं”.

आणखी वाचा – Video : ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा लेक पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना, एअरपोर्टवर झाले भावुक, व्हिडीओ व्हायरल

इरिनाही मॉडेल व अभिनेत्री आहे. इरिनाला सोशल मीडियावरुन प्रसिद्धी मिळाली. त्याचबरोबर नुकतीच ती एका मराठी रॅप सॉंगमध्ये झळकली होती. त्यानंतर ती मराठी इंडस्ट्रीतही लोकप्रिय झाली. इरिनाचं ‘इरा राय’ या नावाने सोशल मीडियावर अकाउंट असून तिचे दीड लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. ‘छोटी सरदारनी’ या हिंदी मालिकेतूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Tags: bigg boss marathiBigg Boss Marathi 5 UpdatesIrina RudakovaIrina Rudakova bigg boss marathikokan hearted girl ankita walavalkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
shahrukh khan health update

उपचारासाठी अमेरिकेमध्ये जाणार शाहरुख खान, पण नक्की झालंय तरी काय?, चाहत्यांमध्येही काळजीचं वातावरण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.