गुरूवार, जून 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“जे ट्रोल करतात तेच माझ्या पाया पडतात”, छोटा पुढारी ट्रोलिंगबाबत स्पष्टच बोलला, म्हणाला, “आई-वडिलांच्या जीवावर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 9, 2025 | 1:40 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ghanshyam Darwade  On trolling

"जे ट्रोल करतात तेच माझ्या पाया पडतात", छोटा पुढारी ट्रोलिंगबाबत स्पष्टच बोलला, म्हणाला, "आई-वडिलांच्या जीवावर…"

Ghanshyam Darwade  On trolling : ट्रोलिंगपासून कोणताही कलाकार काही लांब राहिलेला नाही. अशी अनेक कलाकार मंडळी आहेत जी नेटकऱ्यांच्या तावडीत सापडतात आणि ट्रोलिंगची शिकार होतात. बरेचदा ही मंडळी या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देतात, तर काही कलाकार या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात. अशातच आता ‘बिग बॉस मराठी’ फेम छोटा पुढारीने या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. छोटा पुढारी त्याच्या बेधडक वक्त्यव्यामुळे बरेचदा चर्चेत आलेला पाहायला मिळाला. सोशल मीडियावरही तो नेहमीच काही ना काही शेअर करत चर्चेत असतो. दरम्यान, त्याच्या वक्तव्यांमुळे तो ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकला आहे. मात्र हे ट्रोलिंग त्याला प्रत्यक्षात आवडतं कारण या ट्रोलिंगमुळेच तो आज आहे असं त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

‘बिग बॉस’ फेम घन:श्याम दरवडेने नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाच्या अड्ड्यावर’ हजेरी लावली होती. यावेळी बोलताना ट्रोलिंगबाबत तो म्हणाला, “ट्रोलिंग होतंय म्हणून खरंतर मी भाग्यवान आहे. आज माणसांना त्याच्या आयुष्यात वेळ नाही आहे. आणि लोक माझ्या आयुष्यात एवढं तंतोतंत बघत आहेत की, घनःश्याम उठल्यापासून काय करतो आणि काय करत नाही. ट्रोलिंग करणाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो, कारण त्यांच्यामुळे मला आज एवढी फेम आहे. आणि ते जर नसते तर घनःश्यामच्या आयुष्याला काय अर्थ राहिला असता. जी मुलं मला ट्रोल करतात तिच समोर आल्यानंतर माझ्या पाया पडतात, नमस्कार करतात आणि म्हणतात मी तुमचा खूप मोठा फॅन आहे”.

आणखी वाचा – “आता आवाज उठवण्याची वेळ…”, ‘पारू’ फेम अभिनेत्याने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाला, “तक्रार नोंदवली तर काम…”

पुढे तो म्हणाला, “ग्रामीण भागात असं बोललं जातं की, चावणारे कुत्रे जे भुंकतात ते कधीच चावत नाहीत आणि जे भुंकत नाहीत ते चावतात. ट्रोलिंग करणं म्हणजे कोण आहे जे बेरोजगार आहेत, आई-वडिलांची जीवावर उड्या मारत आहेत तेच आहेत. जे आपापल्या कामात व्यस्त आहेत ते का ट्रोल करतील. त्यांना काही घेणंदेणं नाही. मी तर हे माझं भाग्य मानतो. ट्रोलिंग हे केलं गेलं पाहिजे. ज्या दिवशी लोक ट्रोलिंग करणं थांबवतील त्या दिवशी मी मार्केटमध्ये नसेन. जोवर हे लोक ट्रोलिंग करतील तोपर्यंत मी मार्केटमध्ये असेल. त्यामुळे भावांनो, चांगली जरी पोस्ट असली तरी ट्रोलिंग हे करत जा”.

आणखी वाचा – हृदयाचे ठोके कमी zale , ८ दिवस आयसीयुमध्ये अन्..; उषा नाडकर्णींनी सांगितला ‘तो’ प्रसंग, रुग्णालयात उपचार सुरु असताना…

शेवटी घनःश्याम म्हणाला, “आज सगळ्यात जास्त ट्रोलिंग हे मला केलं जातं आणि सगळ्यात जास्त कामही माझ्याकडे आहेत. ही अगदी अभिमानाची गोष्ट मी सांगतोय. आता ट्रोलिंग मला आवडायला लागलं आहे कारण त्यांच्यामुळे मी आहे. ट्रोलर्सला मी सांगेन की, थोडं तुमच्याही आयुष्यात डोकावून पाहत जा”.

Tags: bigg boss marathientertainmentGhanshyam Darwade
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Renuka Shahane Motherhood Experience
Entertainment

“जर मुलगी झाली असती तर…”, डिलिव्हरीनंतर रेणुका शहाणेला नातेवाईकांकडून वाईट अनुभव, म्हणाली, “वजन कमी करायला…”

जून 12, 2025 | 4:30 pm
CID Dr Salunkhe Narendra Gupta EXIT
Entertainment

CID मधून डॉक्टर साळुंखेंची एक्झिट?, नरेंद्र गुप्तांना शोमधून काढण्यावरुन प्रेक्षकांचा संताप, म्हणाले, “आम्हाला मान्य नाही”

जून 12, 2025 | 4:00 pm
navjot singh sidhu comeback
Entertainment

“‘बिग बॉस’ला माझं मानधन परवडलं नाही म्हणून…”, नवज्योत सिंह सिद्धू यांचं वक्तव्य, चॅनलचा टीआरपी वाढवण्यासाठी…

जून 12, 2025 | 3:00 pm
flood on raam charan film set
Entertainment

Video : अनेक जखमी, लाखोंचं नुकसान अन्…; राम चरणच्या चित्रपटाच्या सेटवर पूर परिस्थिती, भयावह व्हिडीओ समोर

जून 12, 2025 | 1:51 pm
Next Post
Jui gadkari suffer from jaundice

आजारपणातही ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी करतेय शूट, नेहमी सलाईन लावते अन्...; स्वतःच सांगितली परिस्थिती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.