रविवार, ऑगस्ट 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आजारपणातही ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी करतेय शूट, नेहमी सलाईन लावते अन्…; स्वतःच सांगितली परिस्थिती

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 9, 2025 | 2:57 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jui gadkari suffer from jaundice

आजारपणातही ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी करतेय शूट, नेहमीत सलाईन लावते अन्...; स्वतःच सांगितली परिस्थिती

प्रेक्षकांना आपलंस करण्याची ताकद टेलिव्हीजनमध्ये आहे. कित्येक वर्ष आपण हे अनुभवतही आलो आहोत. कित्येक कलाकार छोट्या पडद्यामुळे घडले, नावारुपाला आले. आजही कलाकारांचं घर टीव्ही इंडस्ट्रीमुळे सुरळीत चाललं आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. मात्र झगमगटीच्या दुनियेत वावरत असताना कलाकार कधीतरी स्वतःकडेही लक्ष देणं विसरतो की काय? असं वाटतं. चेहऱ्यावर सतत हास्य ठेवून इतरांना हसवणारा कलाकार नेहमीच आनंदी आणि सुखी असतो असंही नाही. कित्येकदा त्यांनाही पडद्यामागे खऱ्या आयुष्यात करावी लागणारी कसरत, मेहनत अनेकांना दिसत नाही. असंच काहीसं सध्या सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरीबाबत घडत आहे. (Jui gadkari suffer from jaundice)

जुईने आजवर मालिकांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. तिच्या प्रत्येक भूमिका गाजल्या. प्रेक्षकांनी अगदी जुईला डोक्यावर उचलून धरलं. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे तर तिला वेगळीच लोकप्रियता मिळाली आहे. ही मालिकाही कायमच टीआरपीच्या शर्यतीत पुढे असते. असं असताना बऱ्याचदा मालिकेती कलाकारांना १२-१२ तास शिफ्ट करुन अधिक कामंही करावं लागतं. जुईचंही तसंच झालं आहे. जुईला आजारपणात काम करावं लागत आहे.

आणखी वाचा – चार मित्रांमुळे गोविंदाचं करिअर फ्लॉप, फक्त वाह वाह करुन…; अभिनेत्याच्या पत्नीचे गंभीर आरोप, नेहमी वाद कारण…

चार ते पाच दिवसांपूर्वी जुईने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आजारी असल्याचं सांगितलं. घरातील फोटो शेअर करत तिने माहिती दिली. शूट, आजारपण सांभाळून करावी लागणारी तारेवरची कसरत जुईच्या या फोटोमध्ये दिसत आहे. जुई म्हणाली, “कृपया कुठेही जाऊन पाणी पिऊ नका. पाणी उकळूनच प्या. त्याचबरोबरीने घरातीलच खाद्यपदार्थ खा. ओषधं, शूटला जाणं आणि नेहमी सलाईन हेच सध्या आयुष्यात सुरु आहे. कावीळ (jaundice) झाली आहे”.

आणखी वाचा – “जे ट्रोल करतात तेच माझ्या पाया पडतात”, छोटा पुढारी ट्रोलिंगबाबत स्पष्टच बोलला, म्हणाला, “आई-वडिलांच्या जीवावर…”

View this post on Instagram

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

जुई फोटोमध्ये झोपेतून उठून बेडशेजारी बसलेली दिसत आहे. तसेच तिचा चेहराही थोडाफार सुजलेला दिसत आहे. कावीळ असल्यामुळे तिला नेहमी सलाईनही लावावी लागत आहे. काम आणि आजारपण सांभाळताना जुईची तारांबळ उडत आहे. मात्र तरीही थकून न जाता ती तितक्याच जोमाने काम करत आहे. जुईबरोबरच कित्येक कलाकार आजारपण, दुःख लपवून हसऱ्या चेहऱ्याने कॅमेऱ्याला सामोरे जातात. त्यांचं खरंच कौतुक आहे.

Tags: entertainment newsjui gadkarimarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
KRK Congratulates Hina Khan

लग्नानंतर हिना खानने सनातन धर्म स्वीकारला?, अभिनेत्याने केलं अभिनंदन, अभिनेत्रीचा 'तो' फोटो पाहून चर्चांना उधाण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.