छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. या कार्यक्रमातून सई चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. गेल्या अनेक दिवसांपासुन सईचे प्रेग्नंसी फोटोशूट चांगलेच चर्चेत होते. अशातच तिने नुकतीच सोशल मीडियावर आई झाल्याची बातमी सर्वांबरोबर शेअर केली होती. १७ डिसेंबर रोजी तिला कन्यारत्न प्राप्त झाले होते. आई झाल्याची गुडन्यूज सांगत तिने सोशल मीडियावर एक खास पोस्टही शेअर केली होती. सईने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये असे म्हटले होते की, “आमच्या बाळाच्या येण्याची बातमी सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आई व बाळ दोघंही सुखरुप आहे. सगळ्यांच्या प्रेमासाठी व शुभेच्छांसाठी खूप धन्यवाद.”
अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिच्या दैनंदिन घटना शेअर करत असते. नुकतीच सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन स्टोरी पोस्ट शेअर करत तिच्या आईपणाविषयी संमिश्र भावना व्यक्त केल्या होत्या. यात “खूप तक्रारी आहेत, पण तरीही काहीही तक्रार नाही, मी माझ्या छोट्या परीसाठी हे सर्व आनंदाने स्वीकारत आहे.” असं म्हटलं होतं.
अशातच अभिनेत्रीच्या घरी तिच्या लाडक्या लेकीचा बारसाही पार पडला आहे. याचे खास फोटो सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. यात बारश्यासाठी खास फुलांची आरास केलेली पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर पाळणाही फुलांनी सजवला आहे. या फोटोखाली “नव्याने पालक झालो याचा आनंद व अभिमान आहे” असं म्हणत सईने आपल्या पतीबरोबरचे खास फोटो शेअर केले आहेत. मात्र अभिनेत्रीने तिच्या बाळाचे नाव काय ठेवले आहे. याबद्दल सांगितले नाही. त्यामुळे सईच्या बाळाचे नाव काय? याचे चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, सईने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत सईचे अभिनंदन केले आहे. तसेच “अभिनंदन, शुभेच्छा, काळजी घ्या, तुम्हाला खूप प्रेम, बाळाला आणि तुला नजर लागायला नको, दोघांना खूप शुभेच्छा आणि प्रेम” अशा अनेक कमेंट्स करत सईचे कौतुक व अभिनंदन केले आहे.