बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आमिर खानच्या लेकीचं महाराष्ट्रीयन पद्धतीने पार पडणार लग्न, या ठिकाणी शाही विवाहसोहळा होणार, रिसेप्शनही होणार अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 29, 2023 | 5:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ira khan and nupur Shikhare Wedding

आमिर खानच्या लेकीचं महाराष्ट्रीयन पद्धतीने पार पडणार लग्न, या ठिकाणी शाही विवाहसोहळा होणार, रिसेप्शनही होणार अन्…

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खानच्या घरात सध्या लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्याची मुलगी इरा खान तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. इरा व नुपूर यांच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. आमिर खानची मुलगी इरा खान व नुपूर शिखरे यांचा गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात इटली येथे साखरपुडा सोहळा संपन्न झाला. साखरपुड्यातील दोघांच्या रोमँटिक फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. (Ira khan and nupur Shikhare Wedding)

साखरपुड्याच्या दोन महिन्यांनंतर त्यांनी एका पार्टीचे आयोजन केले होते. आमिरचे संपूर्ण कुटुंब तसेच त्याची माजी पत्नी रीना दत्ता व किरण राव, अभिनेत्री फातिमा सना शेख यांच्यासह जवळचा मित्रपरिवार या पार्टीत सहभागी झाला होता. इरा व नुपूरच्या साखरपुड्याची फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. यानंतर आता अखेर आमिरच्या लेकीचा लग्नसोहळा जवळ आला आहे. इरा व नुपूर ३ जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत.

आणखी वाचा – मेघा घाडगे पुन्हा रुग्णालयात दाखल?, हॉस्पिटलमधील व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “करोना परत आला आहे कृपया…”

‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार, आमिर खानच्या मुलीच्या लग्नाच्या कार्यक्रमाची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अहवालानुसार, एका सूत्राने सांगितले की, “खान कुटुंब इराच्या लग्नासाठी खूप आनंदी आहे कारण ते नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवातचं लग्नसोहळ्याने करणार आहेत. इरा व नुपूरचे लग्न ३ जानेवारी रोजी वांद्रे येथील ताज लँड्स एंड या आलिशान हॉटेलमध्ये होणार आहे. यानंतर ६ ते १० जानेवारी दरम्यान दोन रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. यापैकी एक रिसेप्शन दिल्ली येथे तर दुसरे रिसेप्शन जयपूरमध्ये होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आणखी वाचा – “तिच्यासाठी एक सून घेऊन ये”, ट्रोलर्सच्या कमेंटवर करण जोहरचं चोख उत्तर, म्हणाला, “‘टाइमपाससाठी आईला सूनेची…”

रिपोर्टनुसार, असेही समोर आले आहे की, आमिर त्याच्या लेकीच्या लग्नासाठी खूप उत्साहित आहे. तसेच अभिनेता स्वतः बी-टाऊनमधील त्याच्या मित्रांना, सहकाऱ्यांना लग्नाला उपस्थित राहून नववधूवराला आशीर्वाद देण्यासाठी फोन करुनआमंत्रित करत आहे. अहवालानुसार, बहुतेक कलाकार हे सुट्टीसाठी बाहेर गेले आहेत. ज्यांना या लग्नाला येता येणार नाही ते जयपूरमधील रिसेप्शनचा भाग असतील. इरा खान व नुपूरचे लग्न महाराष्ट्रीय रितीरिवाजानुसार होणार आहे.

Tags: aamir khanaamir khan daughterentertainmentira khanIra khan and nupur Shikhare Weddingira khan wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Next Post
bigg boss 17 vicky jain has made serious allegations against munnavar faruqui

Bigg Boss 17 : "नाझिलाचे नाव घेऊन...", 'बिग बॉस'च्या घरात विकी जैनचे मुन्नवरवर गंभीर आरोप, म्हणाला, "तो स्वत:ची चांगली प्रतिमा..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.