मराठी सिनेसृष्टीतील असे बरेचसे कलाकार आहेत जे नेटकऱ्यांकडून सतत ट्रोल होत असतात. मात्र ही कलाकार मंडळी या ट्रोलिंगला न घाबरता प्रेक्षकांना सडेतोड उत्तर देताना दिसतात. यांपैकी एक अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. सई लोकूरने ‘बिग बॉस’मराठी या रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांवर छाप पाडली. मात्र त्यानंतर अभिनेत्री सिनेसृष्टीत कार्यरत राहिली नाही. मराठी ‘बिग बॉस’नंतर सई थेट तिच्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आली. सईने तीर्थदीप रॉयसह लग्नगाठ बांधली. (sai Lokur story)
त्यानंतर काही दिवसांपूर्वीच सईने आई झाली असल्याची गोड बातमी चाहत्यांसह शेअर केली. प्रेग्नेंसीदरम्यान सईचे बरेच प्रेग्नेंसी फोटोशूटचे फोटो चर्चेत राहिले. त्यानंतर १७ डिसेंबर २०२३ रोजी तिला कन्यारत्न प्राप्त झाले. आई झाल्याची गुडन्यूज तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत दिली. आपल्या बाळाची विशेष काळजी घेण्यासाठी सईने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला. सईने खास फोटोशूट करत गरोदर असल्याचं सांगितलं. दरम्यान सईच्या खास डोहाळ जेवणाचे फोटो समोर आले. सईच्या डोहाळ जेवणाचेही बरेच फोटो सोशल मीडियावरुन वाऱ्यासारखे पसरले.

गरोदरपणात सई बरीच ट्रोल झालेली पाहायला मिळाली. सईने तिच्या गरोदरपणात शेअर केलेल्या फोटो, व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं. त्यानंतर आता एका नेटकऱ्याच्या प्रश्नाला सईने दिलेल्या उत्तराने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यांत सईला एका नेटकऱ्याने “प्लॅनिंग की अपघाताने गरोदर राहिलीस?” असा सवाल केला आहे.
नेटकऱ्याच्या या प्रश्नाला सईने अतिशय चोख उत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे. सईने यावर उत्तर देत असं म्हटलं आहे की, “आम्ही पूर्णतः ठरवून बाळाला जन्म दिला आहे आणि मी देवाची आभारी आहे की, कोणताही विलंब न करता ठरल्याप्रमाणे सर्व अगदी सुरळीत घडलं” असं तिने म्हटलं आहे.