Bigg Boss Marathi season 5 : ‘बिग बॉस’ मराठीचं पाचवं पर्व सध्या खूप चर्चेत आहे. हे पर्व आता शेवटच्या टप्प्यात आलं आहे. या आठवड्याच्या शेवटी पॅडी कांबळे घराबाहेर पडले. पॅडी यांचं घराबाहेर जाणं प्रेक्षकांना अजिबात रुचलं नाही. हे नॉमिनेशन चुकीचं असल्याचेही अनेकांनी म्हंटलं आहे. प्रेक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजीदेखील व्यक्त केली आहे. मात्र घराबाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांबरोबर संवाद साधला आहे. पॅडी घरात असताना त्याच्याबरोबर अनेक वादग्रस्त प्रसंगदेखील घडले. अशातच आता त्याने या सर्व प्रकाराबद्दल भाष्य केले आहे. तसेच त्याची ही मुलाखत सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
घरातून पॅडी यांची एक्झिट झाल्यानंतर ते माध्यमांसमोर आले. त्यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली. यामध्ये त्याने घरात घडलेल्या प्रसंगाबाबत भाष्य केले आहे. दरम्यान घरात असताना पॅडीच्या करीअरवर जान्हवी व नक्की यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले होते. अनेक कलाकारांनीदेखील पॅडीची बाजू घेत जान्हवी व निक्कीला सुनावले होते. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनीदेखील जान्हवीला खडे बोल सुनावले होते. याबद्दल पॅडी यांना प्रश्न विचारले, “तुम्हाला बोललं गेलं तेव्हा तुमच्या मुलीने टीमची बाजू घेतली. पण एक अशी तुमची मैत्रीण विशाखा यांनी तुमची बाजू घेतली आणि बिचुकले जेव्हा बोलले तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी स्टँड घेतला, ही तुमची मैत्री नक्की कशी आहे?”
आणखी वाचा – Video : पार्टीत नाचत होता प्रसाद जवादे, बायको न सांगता थेट पोहोचली अन्…; व्हिडीओ व्हायरल
त्यावर पॅडी यांनी उत्तर दिले की, “मी त्यांच्यासाठी म्हणून असा स्टँड नाही घेतला. तुला विशाखा सुभेदार माहीत नाही म्हणजे काय? टेलिव्हीजनवर तू सेलिब्रिटी असल्याचं म्हणतोस. आम्हाला तू माहीत आहेस पण तुला विशाखा माहीत नाही? असं कसं? माझं तेव्हा डोकंच फिरलं. अशावेळी माझी विनोदबुद्धी जागी होते. छोटीशी अभिनेत्री आहे पण तिला खूप लोकं ओळखतात ज्यामध्ये तू नाहीस”.
पुढे पॅडी म्हणाला की, “तू आम्हाला जेव्हा बघायचास तेव्हा आम्ही काम करत होतो. त्याच्या बोलण्याला काही तारतम्य नाही कदाचित तो त्यासाठीच प्रसिद्ध असेल. पण तो माझ्या हातात जर सापडला असता तर त्याला सोलून काढलं असतं हे नक्की”. या सगळ्या प्रकारामुळे पॅडी व विशाखा यांच्यातील घनिष्ट मैत्री दिसून आली.