शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मागून कधीच मान मिळवला नाही”, जान्हवीने केलेल्या अपमानावर पॅडी यांचं भाष्य, म्हणाले, “अजूनही माफी नाहीच”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 1, 2024 | 4:53 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
 Bigg Boss Marathi Season 5

पॅडी कांबळे यांनी जान्हवीच्या वादग्रस्त विधानावर केलं भाष्य

 Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात स्पर्धकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यंदाच्या या पर्वातील स्पर्धक बरेच चर्चेत असलेले पाहायला मिळत आहेत. आता या हे पर्व शेवटच्या टप्प्यात आले असून या वेळी नॉमिनेशनमधून पॅडी कांबळेला एक्झिट घ्यावी लागली. पॅडीचं नॉमिनेट होणं हे सगळ्यांच्या पचनी पडलं नाही. अनेकांनी या कार्यक्रमातील त्याची एक्झिट चुकीची असल्याचेदेखील म्हंटले आहे. तसेच प्रेक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून नाराजीदेखील व्यक्त केली आहे. तो बाहेर पडल्यानंतर अनेक माध्यमांबरोबर त्याने संवाद साधला. यावेळी त्याने घरात घडलेल्या अनेक प्रसंगाबद्दल भाष्य केले आहे. निक्की व जान्हवी यांच्याबद्दल तो भाष्य करताना दिसत आहे.

घरबाहेर आल्यानंतर पॅडीने माध्यमांना मुलाखती दिल्या. नुकतीच त्याने ‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली. यामध्ये त्याने निक्की व जान्हवी यांनी त्याच्या करियरबद्दल केलेल्या अपमानाबद्दल भाष्य केले आहे. त्याला विचारले गेले की, “घरामध्ये तुमच्या कामाबद्दल जान्हवी व निक्की यांनी वादग्रस्त वक्तव्य केले तेव्हा तुम्हाला वाईट वाटलं असणारच, पण तुम्ही खूप शांत राहिलात मात्र सोशल मीडियावर अनेकांनी तुम्हाला पाठिंबा दिला, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?”, त्यावर पॅडीने उत्तर दिले की, “कोणाचाही पाठिंबा मिळवण्यासाठी मी असं केलं नाही. माझा स्वभावच असा आहे. पण भांडण केल्यानंतर तुमचा झालेला अपमान काही कमी होणार नाही किंवा ती गोष्ट मिटणार नव्हती. पण ती बोलली ते बोलली ते सगळं बाहेर छापलं गेलं होतं.

आणखी वाचा – “दुसऱ्यांचं ऐकून तो…”, ‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना यांचे रणवीर सिंहवर आरोप, म्हणाले, “माझ्यासमोर तीन तास बसला कारण…”

पुढे तो म्हणाला की, “त्यामुळे मी चीडचीड करुन काहीही फायदा नाही. पण मी विचार करतो की माझं महत्त्व मला जर वाढवायचं असेल तर मला तेवढी मेहनत करावी लागेल. तसेच मी मागून मान कधीही मिळवणारा माणूस नाही. मी माझं काम करतो आणि आपोआप मान मिळवतो. या गोष्टी मी भूतकाळातदेखील केल्या आहेत. त्यामुळे मी जान्हवीला काही बोललो नाही याचा अर्थ माझं मन खूप मोठं आहे, मी क्षमाशील आहे असं काही नाही. माझा मूळ स्वभावच तो आहे”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सूरजला सहा लाखासाठी अभिजीतने पात्र ठरवल्यामुळे अंकिता-डीपीचा संताप, स्पष्टीकरणही मागितलं, मैत्रीत मोठी फूट

तसेच त्याला विचारले की, “तु जान्हवी व निक्कीला माफ केलं आहेस का?”, त्यावर त्याने उत्तर दिलं की, “नाही. मनातून मी त्यांना माफ केलं नाही”. दरम्यान पॅडीच्या या कामाचे कौतुकही मोठ्या प्रमाणात केले जात आहे.    

Tags: Janhvi Killekarnikki tambolipandhrinath kamble
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
prasad jawade and amruta deshmukh video

Video : पार्टीत नाचत होता प्रसाद जवादे, बायको न सांगता थेट पोहोचली अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.