‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन नुकताच संपला असून या सीझनचा भव्य ग्रँड प्रीमियर सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. १०० दिवसांऐवजी या शोने अवघ्या ७० दिवसांत प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण या ७० दिवसांतही या शोने प्रेक्षकांची भरभरून मनोरंजण केलं. बिग बॉस मराठीच्या अंतिम फेरीपर्यंत एकूण सहा जणांनी सहभाग घेतला होता. यापैकी सूरज व अभिजीत यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आणि सूरजने या शोचे विजेतेपद पटकावले. सूरज हा या शोचा विजेता झाला असून अभिजीत उपविजेता ठरला. त्यामुळे दोघांवर सध्या शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच या दोघांनी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. (Suraj and Abhijeet visited Siddhivinayak)
काल (७ ऑक्टोबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधल्यानंतर सूरज व अभिजीत यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी सूरजने ‘बिग बॉस’ची ट्रॉफी बाप्पाच्या चरणी ठेवली. यावेळी सूरजने “गणपती बाप्पा मोरया”, “जय श्रीराम” असा जयघोषही केला. दोघांच्या या दर्शन घेतानाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सूरज व अभिजीत यांच्या चाहत्यांनीही या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच सूरज व अभिजीत यांच्या या कृतीचे कौतूकही होत आहे.
आणखी वाचा – Video : “दाजी एकदम भारी…”, अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सूरजचं भाष्य, बहीण-भावाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल
सूरजची गणपती बाप्पावर श्रद्धा आहे हे सर्वांनीच पाहिले आहे. ‘बिग बॉस’च्या घरात साजरा झालेल्या गणेशोत्सवात सूरजने गणपती बाप्पाला मोदक दिला होता. तसंच तो गणपती बाप्पाला आपला भाऊ मनात असल्याचेही त्याने सांगितले होते. अशातच त्याने सिद्धिविनाकाचे दर्शन घेतलं असून याचा आनंदही त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. सूरज चव्हाणला ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीसह १४.६ लाखांचा धनादेश बक्षीस स्वरुपात मिळाला आहे.
आणखी वाचा – “झापुक झुपूक काम आणि…”, सूरज चव्हाणचं आर्याने केलं भरभरुन कौतुक, म्हणाली, “माझ्या भावाने…”
दरम्यान, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी हे टॉप-६ सदस्य होते. यामध्ये सर्वात आधी जान्हवी किल्लेकरने ९ लाखांची सुटकेस घेऊन खेळ सोडला. त्यानंतर अंकिता, धनंजय आणि निक्की असे अनुक्रमे हे सदस्य नॉमिनेट झाले. अखेरीस सूरजने बाजी मारून ‘बिग बॉस’ची ट्रॉफी हाती घेतली.