Ankita Walavalkar Husband Comment : बिग बॉस मराठी’ सीझन ५ संपलं असलं तरी या पर्वातील स्पर्धक एकमेकांच्या संपर्कात आहेत. असे अनेक स्पर्धक आहेत ज्यांचं घराबाहेरही स्पेशल बॉण्ड असलेलं पाहायला मिळतं. ‘बिग बॉस’च्या घरात तयार झालेलं ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर आणि डीपी म्हणजेच धनंजय पोवार यांचं भावा-बहिणीचं सुंदर नातं पाहायला मिळालं. तर घराबाहेरही अंकिता व डीपी एकत्र दिसले. अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासह कुणाल भगतसह कोल्हापुरात डीपीची भेट घेतली. ‘बिग बॉस’च्या घरात डीपी अंकिताची लहान बहिणीप्रमाणे काळजी घेताना दिसला आणि यामुळेच त्याचे कुणालने आभार मानले आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात अनेकदा ‘एक ऐसे गगन के तले’ हे किशोर कुमार यांचं जुनं गाणं गायची. अंकिताची आठवण काढत डीपीने त्याच्या बायकोबरोबर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
व्हिडीओ शेअर करत डीपीने याला “बिग बॉस’ची आठवण झाली एकदम” असं कॅप्शन देत यामध्ये अंकिता व कुणाल यांना टॅग केलं होतं. या सुंदर व्हिडीओवर आता अंकितासह तिच्या होणार्या नवऱ्याने खास कमेंट केली आहे. अंकिता कमेंट करत म्हणाली, “‘बिग बॉस’ मला कधी आवडलं नव्हतं. कधी बघितलं पण नव्हतं. तिथे जाऊन आपली भेट झाली आणि मला घरातलं माझं कोणीतरी हक्काचं भांडायला मिळालं जिथे मी रुसू शकते, ओरडू शकते. तुम्ही होता म्हणुन मी होते. हे गाणं कुणाल माझ्यासाठी म्हणतो कारण त्याला वाटतं आता बस्स झालं तुला मी एवढं खूश ठेवेन की तू कधी रडली नाही पाहिजेस. फक्त प्रेम.
पुढे तिने असं म्हटलं की, “तेच गाणं मी गुणगुणत संपूर्ण सीझन घालवला, हा विचार करुन की बाहेर छान आयुष्य आहे आणि सगळं नीट होईल. त्यात तुम्ही माझी घेतलेली काळजी जी बाहेर दाखवली गेलीच नाही. ती मी आणि कुणाल आणि माझं संपूर्ण कुटुंब कधीही विसरणार नाही. आयुष्यभर कायम बरोबर राहा”. तर यावर डीपीनेही कमेंट करत, “तुझी साथ आणि आणि नाते अविस्मरणीय आहे. मी तुलाच नव्हे तर तुझ्या कुटुंबालाही माझं कुटुंब मानतो”, असं म्हटलं.
डीपीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर कुणालने कमेंट करत असं म्हटलं की, “अंकिता या गाण्याचा अर्थ ज्यांना कळला त्यांना कदाचित प्रेम कळलं. ‘बिग बॉस’मध्ये असताना या गाण्याच्या रुपात मी कायम अंकिताबरोबर होतो आणि त्याची जाणीव करुन देण्यासाठी डीपी दादा तुम्ही होता, तुम्हाला त्या गाण्याचा अर्थ कळला. डीपी दादा खंबीरपणे तुम्ही अंकिताबरोबर उभे राहिलात हे मी कधीही विसरणार नाही. त्यासाठी तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. अंकिता बाहेरुन जगाला स्ट्राँग दिसली तरी, अंकिता तुम्हाला आतून कळली त्यासाठी आणि तिची घेतलेली काळजी जी मी अंकिताकडून रोज ऐकतो. या सगळ्यांसाठी तुमचे आभार. लग्नाला नक्की या! हवा तेवढा जोरात कान पिळा”.