मराठी कलाकार मंडळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. शिवाय चालू घडामोडींविषयी भाष्य करत असतात. पण यामुळे हे कलाकार अनेकदा ट्रोलही होतात. काही कलाकार या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देतात, तर काहीजण ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतात. सध्या अभिनेत्री विशाखा सुभेदारचा एक रील चांगलाच चर्चेत आला आहे. या रीलवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Vishakha Subedar On Troller)
आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री विशाखा सुभेदार या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ओशल मीडियावर त्या आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. पण अनेकदा त्यांना त्यांच्या वजनावरुन ट्रोल केलं जात. मात्र या ट्रोल करणाऱ्यांना विशाखा चोख उत्तर देतात. अशातच काही दिवसांपूर्वी विशाखा यांनी ‘आपने पास क्या?’ या गाण्यावर एक रील व्हिडीओ शेअर केला. जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या रीलला अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार, थाटामाटात पार पडलं केळवण, फोटो व्हायरल
मात्र या रीलखाली एका नेटकऱ्याच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या रीलखाली एकाने “कोण आहे ही” अशी कमेंट करत त्यासह गेंडा या प्राण्याची ईमोजीदेखील वापरली आहे. यावर अभिनेत्रीने “तुझी बहीण” असं थेट उत्तर दिलं आहे. त्यावर त्या नेटकऱ्याने पुन्हा एकदा “हो का… मी खूप विचार केला, माझी बहीण नाही. तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे”. असं म्हटलं. मग यावर विशाखा सुभेदारांनीही नेटकऱ्याला उत्तर देत असं म्हटलं की, “मग तुमचा सुद्धा गैरसमज झाला आहे. जरा बोलताना आपल्याला आई-बहीण आहे याचा थोडा विचार करत जा”.
आणखी वाचा – ‘पुष्पा-२’ वादाच्या भोवऱ्यात, चित्रपटात करणी सेनेचा अपमान झाल्याचा आरोप, म्हणाले, “घरात घुसून…”
दरम्यान, विशाखा सुभेदारच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या त्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘शुभविवाह’ मालिकेत रागिणीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेतील त्यांची खलनायिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. यापूर्वी विशाखा ‘फुबाईफू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरांत पोहोचल्या आहेत. या कार्यक्रम व मालिकांव्यतिरिक्त त्यांनी अनेक चित्रपटातदेखील काम केलं आहे.