Bigg Boss Marathi 6 Promo : ‘बिग बॉस’मराठी चा सहावा सिझन सुरु आहे. आणि या सिझनमध्ये आलेल्या सगळ्याच स्पर्धकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हे पर्व संपायला अवघे चार आठवडे शिल्लक आहेत. सुरुवातीला शांत वाटणाऱ्या सदस्यांनी गेम पुढे गेला तसे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. काही स्पर्धक एलिमिनेट झाले. त्यानंतर ‘बिग बॉस’मध्ये राखीची एन्ट्री झाली. राखी ‘बिग बॉस’च्या घरात येताच या सिझन पाहणं अधिक रंगतदार झालं. राखीने घरात येताच स्पर्धकांमध्ये लावालावी करायला सुरुवात केली. अशातच आता ‘बिग बॉस’च्या घरात कधीही आवाज न वाढवणारा सागर कारंडेही बोलताना दिसला. सागरचा हा वाढलेला आवाज गेम प्लॅनसाठी वा चर्चेत येण्यासाठी आहे हे कळेनासे झाले. अनेक टास्कमध्येही सागर मोठ-मोठ्याने बोलताना दिसला. अशातच आता कलर्स मराठीनं ‘ बिग बॉस मराठी ६ ‘चा प्रोमो शेअर केला आहे. यामध्येही सागर मोठ्या आवाजात बोलताना दिसतोय. आणि त्याच हे बोलणं नेटकऱ्यांनी हेरलं आहे.
कलर्स मराठीनं शेअर केलेल्या ‘बिग बॉस मराठी ६’च्या प्रोमोमध्ये कठपुतळीच्या टास्कमध्ये सागर मोठ्याने रेवाला म्हणतोय की, “तूच ह्यांना कन्व्हिन्स केलंयस प्रभूने मला नॉमिनेट करण्यासाठी”. त्यावर रेवा म्हणते, ‘अजून किती खोटं बोलणार दादा?’ पुढे, सागरचा पारा आणखीन चढतो आणि तो म्हणतो, ‘याच्यापेक्षा घाणेरडं रिऍक्ट करता येतं मला”. पुढे, रेवा म्हणते, ‘बाहेर प्रेक्षक बघतायत’. त्यावर सागर म्हणतो, ‘मलाही माहितीये बाहेर प्रेक्षक आहेत, तूच फक्त बोलत राहशील का?’ दरम्यान या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत संताप व्यक्त केला आहे.
आणखी वाचा – “ट्रोलिंगमुळे खूप रडायची आणि त्रास व्हायचा पण…” सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा ट्रोलिंगविषयी मोठा खुलासा
या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत सागरला सुनावलं आहे. “सागर दादा अस करु नका खूप चुकीचं दिसत आहात तुम्ही बाहेर’, ‘सागरला आऊट करा यार. नको तिथे अती करतो. काल पण किती तो अतिशहाणपणा तोडाफोडी टास्क मध्ये. काय बोलत होता त्याला काय तारतम्यच नाही’, ‘बाहेर काढा याला’, ‘सागर ओव्हर ऍक्टिंगचं दुकान’, ‘सारखा बोंबलत असतो हा’, ‘सागरला बाहेर काढा’, ‘सागर साहेब हे अती होतंय थोडं कौतुक काय केलं की लगेच आवाज चढवताय. बाहेर जाण्याचा मार्ग निवडताय’, अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.




