गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ट्रोलिंगमुळे खूप रडायची आणि त्रास व्हायचा पण…” सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा ट्रोलिंगविषयी मोठा खुलासा

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 23, 2026 | 1:21 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Famous Actor Statement On Trolling

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा ट्रोलिंगविषयी मोठा खुलासा

Famous Actress Statement On Trolling : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत झपाट्याने नाव कमावणारी अभिनेत्री श्रीलीला सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या आगामी प्रोजेक्ट्ससोबतच तिने अलीकडे केलेल्या खुलास्यांमुळेही चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. तेलुगू इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारी श्रीलीला लवकरच ‘उस्ताद भगत सिंग’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती पवन कल्याण यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तिच्या करिअरची ही महत्त्वाची पायरी मानली जात आहे.

मात्र, आज यशाच्या शिखरावर असलेल्या श्रीलीलाचा प्रवास सुरुवातीला सोपा नव्हता. अलीकडेच तिने सुमा कनकवाला यांच्या ‘The Reel Flavor’ या चॅट शोमध्ये सहभाग घेतला. यावेळी तिने इंडस्ट्रीत सुरुवातीच्या काळात झालेल्या ट्रोलिंगबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. श्रीलीला म्हणाली की, “मी इंडस्ट्रीत नवीन असताना ट्रोलिंगमुळे मला खूप त्रास व्हायचा. मी खूप भावनिक व्हायचे आणि अनेकदा रडायचेही. मला हे सगळं जमत नाही असं वाटायचं, त्यामुळे मी परत शिक्षणाकडे वळावं का?, असा विचारही मनात यायचा.”

आणखी वाचा – “माझ्या खात्यात फक्त २००० रुपये होते”, गरोदरपणावेळी नीना गुप्ता करत होती आर्थिक संकटाचा सामना, शेवटच्या क्षणी घडला चमत्कार

ती पुढे सांगते, “काळानुसार मी या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकले. आता ट्रोलिंगचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. लोकांची विचारसरणीही बदलली आहे. नकारात्मकतेकडे जास्त लक्ष न देता योग्य गोष्टींचा विचार करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.” दरम्यान, श्रीलीला केवळ दक्षिणेतच नव्हे तर बॉलिवूडमध्येही पाऊल टाकत आहे. ती लवकरच Kartik Aaryan सोबत एका हिंदी चित्रपटात झळकणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. एकूणच, संघर्षातून पुढे येत स्वतःची ओळख निर्माण करणारी श्रीलीला आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा – लग्नाच्या १० वर्षानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, पारंपरिक अंदाजात केलं डोहाळ जेवण, केसांत गजरा माळला अन्…

Tags: bollywood newsentertainment newsFamous Actor Statement On Trolling
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Bigg Boss Marathi 6 Promo

"हे अती होतंय", रेवाला ओरडणं सागर कारंडेला पडलं भारी, नेटकऱ्यांनी धरलं धारेवर, म्हणाले, "ओव्हर ऍक्टिंगचं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.