Prabhu Shelke Eviction : ‘बिग बॉस मराठी’चे सहावे पर्व आता फिनालेच्या दिशेने पाऊल टाकत आहे. ‘बिग बॉस’चे आता ७५ दिवस पूर्ण झाले आहेत. आणि हा शो आता अंतिम टप्प्यात येऊन पोचला असताना सगळेच स्पर्धक इमोशनल झालेले आहेत. या आठवड्यात स्पर्धकांना भेटायला त्यांचे कुटुंबीय आले होते. कुटुंबियांना भेटून सगळ्यांना खूप आनंद झाला. स्पर्धकांच्या कुटुंबीयांनी त्यांना खेळाचे सल्ले दिले. यानंतर आता अखेर आज भाऊचा धक्का होणार आहे, आणि याशिवाय यंदाच्या आठवड्यात कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. दीपाली सय्यद, प्रभू शेळके, राकेश बापट, रेवा कौरसे, अनुश्री माने, सागर कारंडे, संकेत पाठक ही स्पर्धक मंडळी यंदाच्या आठवड्यात नॉमिनेट झाली आहेत. या सात सदस्यांमध्ये कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
अशातच सोशल मीडियावर प्रभू शेळके उर्फ छोटा डॉन घराबाहेर गेल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. “प्रभू काहीच खेळत नाही”, “त्याच कोणतंच मत नाही”, “तो सिम्पथी कार्ड खेळतो”, “प्रभूला स्वतःच मत नाही”, असे अनेक आरोप प्रभूवर केले आहेत. आणि यानंतर आता अखेर प्रभूची घरातून एक्झिट झाली आहे. प्रभूच्या एक्झिटनंतर त्याच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. अद्याप कलर्स मराठीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे उद्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख कोणत्या स्पर्धकाचे नाव घेणार आणि हा स्पर्धक घराबाहेर जाणार हे पाहणं रंजक ठरेल.
आणखी वाचा – “माझ्यात ताकद नाही”, Sacred Games फेम अभिनेत्रीची स्तनाच्या कर्करोगाने वाईट अवस्था, ढसाढसा रडली आणि…
सध्या ‘बिग बॉस’च्या घरात तन्वी कोलते दुसऱ्यांदा कॅप्टन झाली आहे. त्यामुळे तन्वी आता येत्या आठवड्यात गेम फिरवणार का?, याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.





