बुधवार, ऑगस्ट 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दिव्यांका त्रिपाठीच्या पाठोपाठ आणखी एक अभिनेत्री होणार आई, फोटो शेअर करत म्हणाली, “नवीन सुरुवात…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 24, 2026 | 3:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Famous Actress Become mother

अभिनेत्री होणार आई

Famous Actress Become mother : टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. एकामागून एक अभिनेत्री त्यांच्या आयुष्यातील खास टप्प्याची घोषणा करत आहेत. काही दिवसांपूर्वी दिव्यांका त्रिपाठी हिने आई होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. लग्नानंतर तब्बल दहा वर्षांनी, वयाच्या ४१व्या वर्षी ती आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. तिच्या या घोषणेनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

दरम्यान, आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीनेही चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. ‘बंदिनी’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली आसिया काजी लवकरच आई होणार आहे. तिच्या घरी लवकरच चिमुकल्याचं आगमन होणार आहे. ही आनंदाची बातमी तिने खास ईदच्या निमित्ताने चाहत्यांसोबत शेअर केली. आसियाने आपल्या पती गुलशन नैन याच्यासोबत एक गोड व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या हातात बाळासाठीचे छोटे टॉवेल आणि बूट दिसत आहेत, ज्यातून त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या पाहुण्याची चाहूल स्पष्टपणे लागते. हा व्हिडीओ शेअर करत आसियाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “नवीन चंद्र आणि एक नवीन अध्याय… २०२६ मध्ये लवकरच येत आहे. ईद मुबारक.”

आणखी वाचा – “हे अती होतंय”, रेवाला ओरडणं सागर कारंडेला पडलं भारी, नेटकऱ्यांनी धरलं धारेवर, म्हणाले, “ओव्हर ऍक्टिंगचं…”

View this post on Instagram

A post shared by Aasiya Kazzi Nain (@aasiya_o9)

या पोस्टमधून त्यांच्या आयुष्यातील या नव्या प्रवासाचा आनंद स्पष्टपणे दिसून येतो. विशेष म्हणजे, आई-वडील होण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे, चाहत्यांनीही या आनंदात सहभागी होत कमेंट्सद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेक सेलिब्रिटींनीही या जोडीला शुभेच्छा देत त्यांच्या पुढील प्रवासासाठी आशीर्वाद दिले आहेत. एकूणच, टीव्ही इंडस्ट्रीतील या आनंदवार्तांमुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून, दोन्ही अभिनेत्रींच्या आयुष्यातील या नव्या टप्प्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

आणखी वाचा – “ट्रोलिंगमुळे खूप रडायची आणि त्रास व्हायचा पण…” सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा ट्रोलिंगविषयी मोठा खुलासा

Tags: bollywood newsentertainmentFamous Actress Become mother
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Munna Bhai Fame actor's Car Hits Two People
Entertainment

‘लगे राहो मुन्ना भाई’ फेम अभिनेत्याच्या कारची स्कूटरला धडक; दोन जण गंभीर जखमी

ऑगस्ट 18, 2026 | 2:05 pm
Govinda On Affair Rumours
Entertainment

“खरं प्रेम अस्तित्वात आहे का?”; कश्मीरा शाहच्या पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष, म्हणाली, “लग्न, प्रेम…”

ऑगस्ट 17, 2026 | 5:59 pm
Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Swara Bhasker breaks silence on being trolled
Entertainment

“मुस्लिमाशी लग्न करून तुम्ही लठ्ठ आणि कुरुप झालात का?”, ट्रोलिंगवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “सेक्सी मुली…”

ऑगस्ट 12, 2026 | 10:19 am
Next Post
Badshah Second Wedding

घटस्फोटाच्या ६ वर्षांनंतर बादशाह अडकला लग्नबंधनात, 'ही' सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे पत्नी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.