bb marathi rakhi sawant : ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६ च्या घरात राखी सावंतच्या एन्ट्रीने एक वेगळीच दहशत पसरली आहे. बरेच दिवसांपासून ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांमध्ये वेगवेगळी समीकरणे सुरु असलेली पाहायला मिळाली. स्पर्धकांमधील मतभेद, भांडण, मैत्री याची वेगवेगळी उदाहरण यंदाच्या सिझनमध्ये नव्याने पाहायला मिळाली. आणि यांत भर घालत आता राखी सावंत ‘बिग बॉस’च्या घरात दंगा करायला तयार झाली आहे. शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून राखीने एंट्री घेतली आहे. राखी सावंत आता ‘बिग बॉस’च्या घरात वादळासारखी आली आहे. तिच्या एंट्रीचा धमाकेदार प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
“ड्रामा, धक्का आणि धमाका”, या तीन शब्दांची एकच ओळख म्हणजेच. हो तीच… आता आली आहे एंटरटेनमेंटची लहर, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पसरणार एंटरटेनमेंटचा कहर…”, असं म्हणत ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ च्या घरात पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक राखी सावंतची एन्ट्री झाली आहे. राखी सावंत घरात मनोरंजनाची लाट घेऊन येत आहे.
‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेताना राखी म्हणाली, “राखी जाणार आणि गेम पालटणार. माझ्याशिवाय ‘बिग बॉस मराठी’ अधुरं आहे. मी घरात गेल्यावर सगळ्यांचा आवाज गायब होतो. जेव्हा राखी सावंत घरात जाणार तेव्हा फक्त तिची मर्जी चालणार आहे. मी घरात धमाल करणार आहे. तुम्हाला माझे वेगवेगळे Costumes, माझा गेम पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस’ प्लॅटफॉर्म सगळ्यांना मिळत नाही पण, आपल्याला मिळाला आहे तर त्याचा उपयोग करून घ्या हे माझं म्हणणं आहे. रितेश देशमुख अमेझिंग आहेत आणि उत्तम अभिनेते आहेत. संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आपल्या ‘बिग बॉस मराठी’ची चर्चा सुरू आहे. मला खूप अभिमान आहे की, रितेश सर हा शो होस्ट करत आहेत. आपल्या मराठी लोकांसाठी आणि महाराष्ट्रासाठी मी ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी होत आहे”.




