‘बिग बॉस १८’ सध्या खूपच चर्चेत आहे. या पर्वाचा पहिला आठवडा मोठ्या उत्साहात पार पडला. तसेच या पर्वातील पहिले नॉमिनेशनदेखील पार पडणार असून यामध्ये चाहत पांडे, मुस्कान बामणे, गुणरत्न सदावर्ते, करणवीर मेहरा व अविनाश मेहरा हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता यामधून कोणता सदस्य घराबाहेर पडणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच आता वीकेंड का वारमध्ये ‘तांडव की रात’ देखील पार पडणार आहे. यामध्ये सलमान खानबरोबरच मल्लिका शेरावत, तृप्ती डिमरी व राज कुमार यांच्याबरोबरच ‘लाफ्टर शेफ’मधील कलाकारदेखील दिसून येणार आहेत. भारती सिंह, कृष्णा अभिषेक व सुदेश लहरीदेखील दिसून येणार आहेत. (bigg boss 18 weekend ka vaar)
या पर्वाचा पहिलं ‘विकेंड का वार’ १२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सलमान पुन्हा एकदा त्याच्या हटके अंदाजात दिसणार आहे. ‘बिग बॉस’चे चाहते याची आतुरतेने वाटदेखील बघत आहेत. आशातच निर्मात्यांनी ‘विकेंड का वार’चा नवीन प्रोमो प्रदर्शित केला आहे. यांमदये घरातील सदस्य एकमेकांच्या चेहऱ्यावरील मुखवटा हटवताना दिसत आहेत.
तसेच सलमान खान त्यांची शाळादेखील घेत आहेत. दरम्यान समोर आलेल्या प्रोमोमध्ये विवियन डिसेना व चाहत पांडे यांचे भांडण होताना दिसत आहे. याची एक झलक प्रोमोमध्ये बघायला मिळत आहे. तसेच गुणरत्न त्यांच्या हटके अंदाजाने प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसत आहेत.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये गुणरत्न व सलमान दिसून येत आहेत. एका एपिसोडमध्ये सरकार गुणरत्न यांनी त्यांना सरकार घाबरत असल्याचे सांगितले होते. त्यावरूनच सलमान त्यांना बोलताना दिसून येत आहेत. सलमान म्हणतो की, “गुणरत्न यांना खरंच सरकार घाबरते का?”, त्यावर गुणरत्न म्हणतात की, “मी एकदा म्हणालो की मुंबई चालू म्हणजे मुंबई चालू होते. आता माझी चलती आहे आणि हे मी सगळ्यांनाच ओरडून सांगेन”, त्यानंतर सलमान म्हणतो, “गुणरत्न खुश झाले”, त्यानंतर गुणरत्न मोठमोठ्याने हसू लागतात. सलमान व गुणरत्न यांच्यामधील संभाषणाने सेटवर व घरात एकच हशा पिकतो.