Nia Sharma On Bigg Boss 18 : ‘खतरों के खिलाडी १४’ च्या ग्रँड फिनालेदरम्यान ‘बिग बॉस १८’ ची पहिली स्पर्धक म्हणून टीव्ही अभिनेत्री निया शर्माच्या नावाची जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस १८’ची पहिली स्पर्धक म्हणून निया शर्मा हे नाव विशेष चर्चेत आलेलं पाहायला मिळालं. मात्र निया शर्माने ‘बिग बॉस’ सुरु होणार त्या दिवशी पोस्ट शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला. ६ ऑक्टोबरला तिने या शोमध्ये सहभागी होत नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे चाहते निराश व संभ्रमात पडले. या सर्व प्रकरणावर आता नियाने मौन सोडले असून त्यावेळी नेमके काय घडले याचा खुलासा केला आहे.
खरं तर, ‘पिंकविला’ला दिलेल्या एका मुलाखतीत नियाने खुलासा केला होता की, ती याआधी ‘बिग बॉस १८’ मध्ये सहभागी होणार होती, परंतु अचानक नियोजनात बदल झाल्यामुळे तिला बाहेर पडावे लागले. निया म्हणाली, “हे कलर्स होते आणि मला शेवटच्या क्षणी कळवले गेले. मला लाफ्टर शेफ इंटिग्रेशनचा एक भाग व्हायचे होते, पण त्यांनी याची घोषणा केली तेव्हा लाफ्टर शेफ रद्द झाला. यामुळे मला एका विचित्र परिस्थितीत आणले, कारण तिच्या सहभागाबाबत आधीच खूप प्रसिद्धी होती. अचानक बदल होऊनही तिने याबाबत कोणतीही तक्रार केली नाही”.
नियाने पुढे नमूद केले की, हा पूर्णपणे नेटवर्कचा निर्णय होता आणि ती त्यांच्या रणनीतीला पूर्ण समर्थन देते ती म्हणाली, “जर ते माझे नाव वापरुन काही करत असतील तर ते पूर्णपणे ठीक आहे. त्यांच्याबरोबर माझे दोन शो आहेत आणि मी त्यांच्या नियोजनाचा आदर करते”.
आणखी वाचा – ‘सूर जुळले’ म्हणत अंकिता वालावलकरने होणाऱ्या नवऱ्याबरोबर शेअर केले फोटो, कोण आहे तिचा जोडीदार?
विशेष म्हणजे, नियाने या घोषणेकडे आकर्षित केलेल्या लक्षाचे कौतुक केले आणि कबूल केले की तिच्या नावाबद्दल खूप उत्साह आहे. याबाबत बोलताना तिने असे म्हटलं की, “प्रसिद्धी खूप मोठी होती आणि मी त्याचा आनंद घेतला”. ती गमतीत असेही म्हणाली की, “जोपर्यंत कोणीतरी ‘बिग बॉस’ करत नाही तोपर्यंत लोक चर्चा करत नाहीत”.