शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : घरच्यांना फोन लावताच ढसाढसा रडले Bigg Boss Marathi चे सदस्य, पॅडी, सूरजच्या अश्रूंचा बांध फुटला अन्…; व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 16, 2024 | 11:46 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Varsha Usgaonkar, Ankita Walawalkar, Suraj Chavan, Paddy Kamble, Ghanshyam Darwade, Janhvi Killekar, Nikki Tamboli and Arbaaz Patel, Aarya Jadhav are emotional

Bigg Boss Marathi 5 च्या घरात सूरज, अंकिता, पॅडीसह सगळेच स्पर्धक भावुक, घरच्यांची आठवण येताच लागले रडू

Bigg Boss Marathi 5 : सध्या चर्चा आहे ती म्हणजे ‘बिग बॉस मराठी’ची. यंदाचे हे पाचवे पर्व असून दिवसेंदिवस या नवीन पर्वाची रंगत वाढताना दिसत आहे. या शोमध्ये आल्यावर अनेक स्पर्धक आपले मनं मोकळे करताना दिसतात. ‘बिग बॉसच्या घरात येणारे स्पर्धक हे त्यांच्या घरापासून, प्रिय व्यक्तीपासून लांब  असतात. त्यामुळे अनेकदा त्यांना घरच्यांची आठवण येत असते आणि या आठवणीत ते भावुकही होतात. घरातील इतर स्पर्धकांकडे ते आपल्या भावना व्यक्त करतात. यावेळी त्यांना रडूही येतं. साहजिकच घरच्यांची आठवणीमुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागतात. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वातील स्पर्धकही घरच्यांच्या आठवणीत भावुक होणार आहेत. (Bigg Boss Marathi 5 New Promo)

कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये घरातील सर्व स्पर्धक त्यांच्या प्रिय व्यक्तींच्या खास आठवणीत भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोमध्ये वर्षा उसगांवकर, अंकिता वालावालकर, सूरज चव्हाण, पॅडी कांबळे, घन:श्याम दरवडे, जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी व अरबाजसह सगळेच भावुक झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. या घरात ‘बिग बॉस’ घरातील स्पर्धकांना त्यांच्या प्रिय व्यक्तींना फोन लावून द्यायला सांगणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुला अजून हाणलं नाही”, सूरजचा वैभवला दम, अरबाज-निक्कीवरही पडला भारी, नवा गेम पाहून सर्वच थक्क

वर्षा यांनी त्यांच्या वडिलांना फोन लावताच “आज मला तुझी खूप आठवण येत आहे पप्पा” असं म्हणतात आणि रडू लागतात, तर अंकिता “तुझ्याबरोबर शेवटचं बोलायचं राहील अरे” असं म्हणत ढसाढसा रडते. तर सूरजही त्याच्या आईच्या आठवणीत खूपच भावुक झाला आहे. यावेळी तो आपल्या आईच्या आठवणीत “तुझ्या लेकराला आता कोण सांभाळणार गं?” असं म्हणत आहे.

आणखी वाचा – “स्वत:च्या सीझनमध्ये फेम न मिळवलेले…”, Bigg Boss Marathi विषयी बोलणाऱ्या कलाकारांना अपूर्वा नेमळेकरचा टोला, नक्की कोणाला हिणावलं?

दरम्यान, बिग बॉसच्या घरात कायमच राडे, हाणामारी, वाद, भांडण पाहायला मिळतं. खेळ व टास्क जिंकण्यासाठी स्पर्धक अक्षरश: एकमेकांच्या जीवावर धावून जातात. ‘बिग बॉस’च्या नवीन पर्वातही सुरुवातीपासूनच भांडण वाद पाहायला मिळाले. अशातच आता हा नवीन प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या घरातील सर्व स्पर्धकांना भावुक होताना पाहून चाहतेही भावुक होतील हे नक्की…                

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 NewsBigg Boss marathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Next Post
Bigg Boss Marathi 5

"भीती पाहिजे, आता घुसून मारणार", सूरज टास्कमध्ये बिनधास्त नडत आहे पाहून उत्कर्ष शिंदे भारावला, म्हणाला, "तू तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.