Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सध्या चांगलाच गाजतोय. यंदाच्या सीझनमध्ये काही वेगळे चेहरे पाहायला मिळत आहेत. यातील काही किएटर्स आहेत कर काही अभिनेते. दिवसेंदिवस हे किएटर्स कलाकारांवर भारी पडताना दिसत आहेत. यातीलच एक सर्वांच्या ओळखीचा चेहरा म्हणजे गोलीगत सूरज चव्हाण. गोलीगत सूरजचा हा नवीन पॅटर्न सध्या सर्वच प्रेक्षकांना आवडू लागला आहे. दिवसेंदिवस दिवस त्याच्या खेळात रंगत येत चालली असून ही रंगत त्याच्या अनेक चाहत्यांच्या पसंतीस पडू लागली आहे. सुरुवातीला खेळापासून व टास्कपासून दूर राहणारा सूरज आता प्रत्येक खेळात आणि प्रत्येक टास्कमध्ये अगदी हिरीरीने सहभागी होत आहे आणि त्याचा हा सहभाग पाहून प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
अशातच सूरज पुन्हा एकदा अनेकांच्या कौतुकाचे कारण बनला आहे त्याचं कारण म्हणजे सूरजची नवीन खेळी. ‘बिग बॉस’च्या घरात नुकताच कॅप्टन्सीचा टास्क रंगणार आहे आणि या टास्कमध्ये सूरज चव्हाण त्याचा गोलीगत पॅटर्न वापरून खेळात नवी रंगत आणणार आहे. याचा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे. ‘बिग बॉस मराठी’चा आजच्या एपिसोडचा पहिला प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोने सर्वांनाच थक्क केलं आहे. सूरज चव्हाणचा गोलीगत पॅटर्न या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
या नव्या प्रोमोमध्ये “माझं मी बघेन”, म्हणत निक्की, अरबाज आणि जान्हवी या तगड्या सदस्यांबरोबर सूरज चांगलाच भिडताना दिसत आहे. सूरज चव्हाण आता आपले खरे रंग दाखवताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर तो अरबाजलादेखील थेट भिडलेला या प्रोमोमध्ये दिसून येत आहे. सुरुवातीपासूनच त्याला चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा आहे. चेहऱ्यावर हसू ठेवणाऱ्या सूरजच्या वैयक्तिक आयुष्यात बरंच काही घडून गेलंय. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अनेकदा तो याबद्दल भाष्य करताना दिसत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर सूरजचं चांगलच कौतुक होत आहे.
दरम्यान, या नवीन प्रोमोमधून सूरज त्याच्या हटके स्टाइलने सर्वानाच थक्क करताना दिसून येत आहे. अरबाज, वैभव, निक्की व जान्हवी यांना तो पुरून उरत आहे. त्यामुळे आता या कॅप्टन्सी टास्कमध्ये तो आणखी नवीन रंगत काय आणणार?तो कॅप्टन पदाचा दावेदार होणार का? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.