Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाने जोर धरलेला पाहायला मिळत आहे. स्पर्धक मंडळींची स्वतःला सिद्ध करण्यासाठी चुरशीची लढाई पाहायला मिळाली. यावेळी पहिले दोन आठवडे कायम शांत राहणाऱ्या, गेम न समजलेल्या सूरज चव्हाणने स्वतःचा इंगा दाखवायला सुरुवात केली आहे. मात्र आता सूरजने स्वतःमध्ये बदल केला असून त्याने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून सूरजचं कौतुक केलं जात आहे. सुरुवातीला धड बोलताही न आल्याने सूरज शांत होता. मात्र ‘बिग बॉस’ने आणि रितेश देशमुखने त्याला न घाबरता खेळण्याचा सल्ला दिला.
याशिवाय रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर प्रेक्षकही तुझ्यावर प्रेम करतात, संपूर्ण महाराष्ट्र प्रेम करतो त्यामुळे तू ही लढाई लढ असे सांगितल्यावर सूरजने स्वतःमध्ये बदल केला असून त्यांने लढाई लढण्यास सुरुवात केली. नुकत्याच झालेल्या टास्कमध्ये सूरज पेटून उठलेला पाहायला मिळाला. तर घरातले इतर सदस्यही सूरजला सपोर्ट करताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही त्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. ‘बिग बॉस मराठी’ वर टिप्पणी करणाऱ्या अभिनेता, गायक उत्कर्ष शिंदेने याआधीही ‘बिग बॉस मराठी’च्या स्पर्धकांबाबत भाष्य केलं. दरम्यान त्याने अनेकदा सूरजला सपोर्टही केलेला पाहायला मिळाला. आता सूरजचा हा खेळ पाहून उत्कर्षने केलेली कमेंट लक्ष वेधून घेत आहे.
उत्कर्षने सूरजच्या समोर आलेल्या प्रोमोखाली कमेंट करत असं म्हटलं आहे की, “‘डर होना चाहिये और वो भी सामने वाले के दिल मै होना चाहिये. क्या बात है सूरज. एक लाईन आठवली सूरजचा कॉन्फिडन्स बघून. जब भी मारुंगा घूस के मारुंगा”, असं म्हटलं आहे. तर ‘बिग बॉस’ फेम मीनल शाहनेही या प्रोमोखाली कमेंट करत, “सूरज तर फायर आहे. आता मज्जा येईल”, असं म्हणत त्याच कौतुक केलं आहे.

कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सूरज, वैभवला असं सांगत आहे की, “मी त्याला अजून मारलं नाही”. त्यावर वैभव त्याला विचारतो, “तू असे हात पाय करु नकोस”. वैभवच्या बोलण्यावर सूरज संतापतो आणि म्हणतो, “माझं मी बघेन”. त्यानंतर सूरज व अरबाज यांच्यामध्ये धक्काबुक्की होते. सूरज, अरबाजला भिडताना दिसत आहे.