शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “त्याने माझा वापर केला कारण…”, घराबाहेर आल्यानंतर वैभवचे अरबाजबाबत उघडले डोळे, म्हणाला, “मला जाणवलं…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 16, 2024 | 1:46 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5 Vaibhav Chavan commented on his friendship with Arbaaz Patel in the house

Bigg Boss Marathi 5 च्या घरातील अरबाजबरोबरची मैत्री ही फक्त माझ्या बाजूनेच असल्याचे वैभवचं भाष्य

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे प्रत्येक पर्व हे भांडण वाद व राडे यामुळे जितके गाजते तितकेच ते घरातील मैत्रीच्या नात्यामुळेदेखील गाजते, ‘बिग बॉस मराठी’च्या प्रत्येक पर्वात कुणी ना कुणी एकमेकांचे कट्टर मित्र बनतात, ज्यांची घरात आणि घराबाहरेही तितकीच चर्चा होताना दिसते. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या  पर्वातही अशीच एक मित्रांची जोडी होती ती म्हणजे अरबाज व वैभव यांची. ‘बिग बॉस’च्या घरात हे दोघे एकमेकांविरुद्ध उभे राहतील की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. मात्र हे दोघे एकमेकांविरुद्ध न खेळता एकमेकांसाठी खेळले. हे दोघे एकमेकांबरोबर इतके एकत्र राहिले की रितेशने वैभवला ‘अरबाजची सावली’ व ‘अरबाज २’ असं अनेकदा म्हटलं. पण तरीही वैभवकडून अरबाजबद्दलच्या मैत्रीत काही कमी दिसून आली नाही. (Vaibhav Chavan on friendship with Arbaaz Patel)

पण आता ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यानंतर वैभवने अरबाजबरोबरची मैत्री ही फक्त माझ्या बाजूनेच असल्याचे म्हटलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर येताच वैभवला अरबाजबरोबरच्या मैत्रीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी वैभवने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं. यावेळी तो म्हणाला की, “बाहेर जर तसं दिसलं असेल तर तसंच होतं ते. मीच त्याला अधिक महत्त्व देत होतो. पण त्याच्याकडून तसं फार काही नव्हतं हे मला आतमध्येच जाणवलं होतं. रितेश भाऊंनीही याबाबत मला कल्पना दिली होती. माझ्या कोणत्याच गोष्टीला त्याने विरोध केला नाही. तो माझ्याशी स्वतःहूनही कधी भांडला नाही. मीही त्याच्याशी स्वतःहून भांडलो नाही. किंबहूना घरातील इतर सदस्यांबरोबरही मी उगाच भांडणं केली नाहीत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : शेवटी लेकच ती! पॅडीच्या मुलीनेच काढली त्याची समजूत, मुलीला पाहून पाणावले डोळे, म्हणाली, “घरातील काळजी…”

यापुढे वैभव असं म्हणाला की, “कदाचित अरबाजने माझा वापर करुन घेतला असंही असू शकतं. कारण तो आधीच गेम खेळून आलेला आहे. त्यामुळे माझा वापर करुन घेणं हा त्याचा गेमही असू शकतो. पण माझं त्याच्याबरोबर जे काही होतं ते तोंडावर होतं. मी त्यामध्ये कधीच गेम दाखवला नाही”. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरातील मैत्रीसाठी अरबाज पेक्षा मीच अधिक महत्त्व दिले असल्याचे त्याने यावेळी म्हटलं. असं असलं तरीही वैभव एलिमिनेट झाल्याचं रितेशने जाहिर करताच जान्हवीला अश्रू अनावर झाले तर अरबाज अगदी धाय मोकळून रडला. यावेळी तो रडत रडत रितेशला वैभवला घरात राहण्यासाठी आणखी एक संधी द्या असंही वारंवार म्हणताना दिसला.

आणखी वाचा – Video : मायरा वायकुळला भाऊ झाल्यानंतर रुग्णालयात कुटुंबियांचा एकच जल्लोष, दीदी झाले म्हणत रडू लागली अन्…

दरम्यान, बारामतीचा रांगडा गडी असलेल्या वैभवकडून प्रेक्षकांना जेवढ्या अपेक्षा होत्या तेवढा त्याचा खेळ काही दिसला नाही, त्यामुळे प्रेक्षक नाराज होते. तो अरबाजच्या आड खेळतो, असंही त्याला सुनावण्यात आलं होतं. सोनं करण्याची संधी असूनही वैभव खेळत नाहीये, अशाही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया होत्या आणि अखेर तो या घरातून बाहेर आला आहे. परंतु या घरातील वैभव-इरिनाची मैत्री मात्र प्रेक्षकांना भावली.

Tags: Arbaaz Patelbigg boss marathi 5Vaibhav Chavan commented on his friendship with Arbaaz Patel
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Sade Made Teen Marathi Movie Part 2

‘साडे माडे ३’च्या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात, रिंकू राजगुरुचीही एन्ट्री, काय असणार नवीन?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.