गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : शेवटी लेकच ती! पॅडीच्या मुलीनेच काढली त्याची समजूत, मुलीला पाहून पाणावले डोळे, म्हणाली, “घरातील काळजी…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 16, 2024 | 12:59 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Paddy Kamble gets emotional after watching daughter and hug to Riteish Deshmukh

Bigg Boss Marathi 5 च्या घरात लेकीला पाहून पॅडी कांबळे भावुक, रडत रडत रितेशला घट्ट मिठी मारली अन्,..

Bigg Boss Marathi 5 : कोणत्याही बापासाठी आपल्या लेकींपासून एक दिवसही लांब राहणे अशक्य असते. अशा काळात लेकींपासून तब्बल शंभर दिवस लांब राहण्याचा प्रवास सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील मंडळी करत आहेत. त्यामुळे साहजिकच ‘बिग बॉस’मधील वडिलांना आपल्या मुलांची आठवण येत आहे. अशातच रविवारच्या ‘बिग बॉस मराठी’च्या भाऊचा धक्कामध्ये रितेश देशमुखने सर्व सदस्यांना त्यांच्या कुटुंबियांचा व्हिडीओ दाखवला. यावेळी घरातील सर्वच स्पर्धक तब्बल दीड महिन्यानंतर आपल्या कुटुंबीयांना पाहून भावुक झाले. कुटुंबीयांना पाहिल्यानंतर अंकिता, अभिजीत, डीपी, अरबाज व पॅडी हे सदस्य खूपच भावुक झाले. यावेळी पंढरीनाथ यांना पाहून त्यांची लेक ग्रिष्मा कांबळेने आपल्या बाबाला धीर दिला आणि त्याच्या खेळाचं कौतुकही केलं. (Bigg Boss Marathi 5 Paddy Kamble Emotional)

यावेळी ग्रिष्मा असं म्हणाली की, “बाबा कसा आहेस? घरची अजिबात काळजी करु नकोस. आम्ही सगळे मजेत आहोत. खरंतर सणवारानिमित्त तुझी जास्त आठवण येत आहे. पण बिग बॉसच्या घरातला तुझा आतापर्यंतचा खंबीर प्रवास पाहून यापुढचे शंभर दिवस काढायला आम्हाला काही हरकत नाही. कारण तो विश्वास तू आम्हाला दिला आहेस. शंभराव्या दिवशी नक्की भेटू. आम्हाला तुझी खूप आठवण येत आहे”. या व्हिडिओदरम्यान, पॅडी व त्यांच्या लेकींचे काही खास फोटोही दाखवण्यात आले. यामध्ये बापलेकींचे काही अनमोल क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळाले. मुलीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर पॅडी कांबळेही खूप भावुक झाले.

View this post on Instagram

A post shared by Paddy Kamble (@paddykamble)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “कधीच कोणावर हात उचलला नाही पण…”, निक्कीला कानाखाली मारल्यानंतर आर्याचं पहिल्यांदाच वक्तव्य, म्हणाली, “मागे वळून बघताना…”

पण भावुक होऊनची त्यांनी स्वतःला सावरलं आणि असं म्हटलं की, “त्यांना माहिती आहे बाबा काही चुकीचं वागणार नाही. बाबा काही चुकीचं करणार नाही. बाबा जसा आहे तसा तिकडे गेममध्ये करणार. कारण त्यांना तो विश्वास आहे आणि त्याच विश्वासाच्या जोरावर मी इथे खेळतोय. मला त्यांचीही खूप आठवण येतेय. पण शंभर दिवसांनी नक्की भेटूया.” यानंतर पंढरीनाथने रितेशला मिठी मारतात. यावेळी घरचे सगळेच भावनिक होतात. ग्रिष्मा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक  फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या या फोटो व व्हिडिओलाअ नेटकऱ्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत असतो.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : डीपी व अंकिताच्या नात्यामध्ये फूट, अभिजीतसमोर केलं गॉसिप, म्हणाला, “आता बस्स! माझ्याकडून…”

दरम्यान, पॅडी कांबळे सध्या ‘बिग बॉस’च्या घरात असल्यामुळे ती ‘बिग बॉस’बद्दलची मतंही सोशल मीडियावर व्यक्त करत असते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने पंढरीनाथ कांबळे यांचा अपमान केला होता, तेव्हा ग्रिष्माने बाबाच्या समर्थनार्थ भली मोठी पोस्ट सोशल मीडियावर लिहिली होती. तिने या पोस्टमधून जान्हवीची चांगलीच शाळा घेतली होती आणि तिची ही पोस्ट अनेकांनी शेअर करत तिला पाठींबादेखील दिला होता.    

Tags: Bigg Boss Marathi 5 daily updatesBigg Boss Marathi 5 Paddy KamblePaddy Kamble Emotional
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
govinda second daughter died

गोविंदाच्या मुलीचा जन्माच्या तीन महिन्यांतच झाला होता मृत्यू, पहिल्यांदाच खुलासा, फुफ्फुसांचा आजार आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.