शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

निक्की-अरबाजनंतर आता Bigg Boss Marathiच्या घरात नवं कपल, इरिनाच्या प्रेमात वैभव वेडापीसा, व्हिडीओमध्ये दिसली जवळीक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 6, 2024 | 1:49 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bigg boss marathi season 5 vaibhav chavan and irina rudakova love

'बिग बॉस मराठी' सीझन ५ मध्ये वाहत आहेत प्रेमाचे वारे, वैभव चव्हाण व इरिना रूडाकोवामध्ये फुलतंय प्रेम

Bigg Boss Marathi 5 Updates : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५च्या घरात स्पर्धकांमध्ये प्रेमाचे बंध फुलताना दिसत आहेत. घरात येण्याआधी पासूनच अरबाज व निक्की यांचं जुळतंय असं वाटत होतं. अरबाज व निक्की हे घरात आल्यावरही बरेचदा प्रेमाने एकमेकांशी बोलताना दिसले. दोघांमध्ये प्रेम जुळतंय हे पाहून घरातील इतर स्पर्धकही त्यांना एकमेकांच्या नावाने चिडवू लागले. यानंतर आता ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा एकदा प्रेमाचे वारे वाहू लागले असल्याचं दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील या नव्या प्रेमाने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनच्या सुरुवातीपासून निक्की व अरबाज पटेलचा बॉण्ड नेटकऱ्यांच्या व ‘बिग बॉस’प्रेमींच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. अशातच आता आणखी एक प्रेमकहाणी फुलू शकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रांगड्या मातीत परदेसी प्रेमाचं रोपटं फुलताना दिसून येणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये वैभव चव्हाण इरिनाचं वारंवार कौतुक करताना आणि तिला जास्त महत्त्व देताना दिसून येत आहे.

Bigg Boss Marathi : “बुक्कीतच मुंडी छाटेन” वैभवने सूरज चव्हाणला डिवचलं, तोही भडकला, म्हणाला, “हात लावून तर बघ”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

नुकताच ‘बिग बॉस’चा कॅप्टन्सीसाठीचा एक प्रोमो समोर आला. यामध्ये स्पर्धक एकमेकांना भिडताना दिसत आहेत. यात सूरज व वैभव यांच्यात तुफान राडा होताना दिसत आहेत. सीट मिळवण्यासाठी सूरज व वैभव एकमेकांसमोर आले असून यामुळे त्यांच्यात जोरदार वाद होत आहेत. यावेळी सूरज वैभवची सीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. सूरज व वैभव यांच्या या वादामध्येही इरिनामध्ये पडते आणि सूरजला शांत करते. टास्क झाल्यानंर वैभव इरिनाला घेऊन बाजूला जातो.

Bigg Boss Marathi : “निक्कीला उडवा”, वर्षा उसगांवकरांचा राग काही संपेना, पण अभिजीत सावंतनेच पलटला गेम, तिला पाठिंबा देतोय कारण…

यानंतर आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये वैभव चव्हाण इरिनाला म्हणत आहे की,”कालपेक्षा तू आज जास्त सुंदर दिसतेस. मला तू जास्त महत्त्वाची व्यक्ती असल्याचं फिल होतंय”. त्यावर इरिना ‘हो’ असं उत्तर देते. तर दुसरीकडे जान्हवी वैभवला म्हणते, “फॉरेनची पाटलीन मस्त आहे”. त्यावर निक्की म्हणते,”भाई. तुझं काय चाललंय”. बारामतीचा रांगडा गडी अभिनेता वैभव चव्हाण व परदेसी गर्ल इरिना रूडाकोवा यांच्यात खरंच प्रेम फुलतंय की ही वैभवची गेमसाठीची स्ट्रॅटजी आहे हे येणाऱ्या भागांत कळेल.

Tags: bigg boss marathiBigg Boss Marathi 5 Updatesvaibhav chavan and irina love
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada serial update Adhipati took the charuhas out of the house

Tula Shikvin Changlach Dhada : अधिपतीने चारुहासला काढलं घराबाहेर, हाताने धरुन खेचलं अन्…; अक्षरापासूनही दूर होणार?, पुन्हा वाद

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.