Bigg Boss Marathi 5 Update : ‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या नवीन सीझनमधील घराला पहिला कॅप्टन मिळाला आहे. ‘कोकणहार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर ही ‘बिग बॉस’च्या घराची कॅप्टन झाली आहे. कॅप्टन्सी टास्कमध्ये शेवटच्या टप्प्यात योगिताने आपला कौल अंकिताच्या बाजूने दिला. ‘कॅप्टन्सी टास्क’च्या दरम्यान घरातील सदस्यांमध्ये जोरदार वादावादी झाल्याचे दिसून आले. घरचा कॅप्टन ठरवण्यासाठी ‘बिग बॉस’ने सदस्यांसाठी ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ हा टास्क ठेवला होता. या टास्क दरम्यान मोटरमनच्या केबिनमधील सीटवर जो बसेल तो कॅप्टन पदाचा उमेदवार ठरवणार असतो. मोटरमनसाठी दोन जागा असतात. त्याशिवाय, ट्रेनमध्ये हिरवी व लाल मार्गिका असे दोन भाग केले असतात. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या आदेशानंतर ट्रेन कोणत्या मार्गिकेवर धावणार हे ठरते. त्या मार्गिकेवर जे स्पर्धक बसले आहेत, त्यांच्यातील एक सदस्य कॅप्टनपदासाठी पात्र ठरणार असतो. (Bigg Boss Marathi 5 daily Update)
यात टास्कदरम्यान, पिवळ्या रेषेच्या सगळे स्पर्धक उभे राहिलेले असताना, पंढरीनाथ पिवळ्या रेषेच्या पलीकडे जाऊन उभे असतात. याच मुद्द्यावरुन निक्की वर्षाताईंना ते पक्षपातीपणा करत असल्याचे म्हणते. याचदरम्यान, अरबाज व आर्या एकमेकांशे बोलत असतात. यावेळी अरबाज आर्याला “टास्कमध्ये खेळत असताना चुकून माझ्याकडून तुला लागू शकतं” असं सांगत असतो. हेच निक्की व जान्हवी बघतात. यावेळी निक्की अरबाजला “तू तुझ्या खेळावर लक्ष दे, कुणाशी बोलू नकोस” असं म्हणते.
यापुढे जान्हवी निक्कीला “आर्या अरबाजला अडवण्याचा प्रयत्न करत आहे का?” असं म्हणत “ती त्याच्यावर संधी साधण्याचा प्रयत्न करत आहे” असं म्हणते. यावर निक्की पुन्हा “ती डोळ्याला काजळ लावून असं असं करते”. असं म्हणते. यानंतर निक्की आर्याच्या जवळ जात मी तुलाच अडवते. म्हणजे अरबाज त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करेल” असं म्हणते. या कार्यासाठी वर्षा उसगांवकर यांना संचालक म्हणून नेमण्यात आले, शिवाय त्यादेखील या कार्यात सहभागी होतात.
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वाची पहिली कॅप्टन होण्याचा बहुमान अंकिताला मिळाला आहे. अंकिता कॅप्टन झाल्यावर डिपी दादा अंकिताला उचलून कॅप्टनच्या खोलीत नेतो. त्या ठिकाणी यंदाच्या सीझनमधील कॅप्टनसाठी अभिजित व इतर सदस्य गाणं गातात. मात्र, यात निक्की, अरबाज, जान्हवी, वैभव हा ग्रुप सहभागी झालेला नसतो.