Bigg Boss Marathi 5 update : ‘बिग बॉस मराठी’ सीजन ५ च्या घरात आता प्रेमाचे वारे वाहू लागलेले पाहायला मिळत आहेत. कालच समोर आलेल्या भागांमध्ये असं पाहायला मिळालं की, मराठमोळ्या मातीतील रांगडा गडी वैभव चव्हाण हा परदेशी गर्ल इरिना रुडाकोवाच्या प्रेमात पडला. इरिनाचं वागणं बोलणं, सगळंच काही वैभवला आता आवडू लागले असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकत्याच कालच्या भागात असं पाहायला मिळालं की, वैभव व इरिना एकत्र बरेचदा बोलतानाही दिसले. यावेळी वैभवच्या मनात इरिना विषयीचा आदर, प्रेम पाहायला मिळाला.
एकूणच हा रांगडा मातीतील गडी आता परदेशी गर्लच्या प्रेमात पडलेला पाहायला मिळाला. एकीकडे लपून-छपून सुरु असलेलं हे प्रेम रॅपर आर्या जाधवला पाहावेना. कारण आता ‘बिग बॉस मराठी’ सीजनमध्ये लव्ह ट्रँगल पाहायला मिळत आहे. आर्या जाधव ही सुद्धा वैभव चव्हाणच्या प्रेमात पडली आहे. वैभव चव्हाण तिला आवडू लागला असल्याचं तिनं सगळ्यांसमोर स्पष्ट केलं आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, वैभव म्हणतो, “कसली क्युट आहे रे ही” आणि ते दोघेजण मस्ती करत असतात.
त्याच वेळेला इकडे हे सगळं काही पाहून आर्या जोर जोरात रडू लागते. त्यावेळी इतर स्पर्धा आर्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. मात्र आर्या काही समजून घेत नाही त्यानंतर वैभव आर्याशी बोलायला म्हणून येतो. ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आर्याचा मात्र हार्टब्रेक झाल्याने ओक्साबोक्शी रडताना दिसत आहे. पुढे वैभव आर्याला विचारतो,”काय विषय आहे नक्की?”. त्यावर आर्या म्हणते,”मला तू नॅचरली attractive वाटतो”. यावर वैभव म्हणतो, “मी तर तुला असं कोणतं इंटेंशन दिलेलं नाही”. यावर आर्या म्हणते, “मला होऊ शकतं attraction”.
हे ऐकून वैभव शांतच होतो. आता आर्याचं वैभववर खरंच प्रेम आहे का?, हे प्रेम वैभव स्वीकारेल का?, हे सारं पाहणं येत्या सीजनमध्ये रंजक ठरणार आहे. बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, सुरज चव्हाण, निखल दामले, निक्की तांबोळी आणि घन:श्याम दरवडे हे सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या सहा सदस्यांमधून या आठवड्यात कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेणार हे पाहावे लागेल.