Tula Shikvin Changlach Dhada : छोट्या पडद्यावरील मालिकेचा प्रेक्षकवर्ग हा मालिकेच्या कथानकाबद्दल चोखंदल असतो. मालिकेत घडणाऱ्या कथानकाशी ते स्वत:चा संबंध लावतात. त्यामुळे मालिकेतील व मालिकेच्या कथानकाबद्दल प्रत्येक प्रेक्षक आपली प्रतिक्रिया देत असतो. मालिकेच्या कथानकातील एखादा ट्विस्ट प्रेक्षकांना आवडला तर ते त्यावर आपली पसंती दर्शवतात. तसंच कथानकातील एखादा ट्विस्ट आवडला नाही तर त्याबद्दलही प्रेक्षक आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. अशातच तुला शिकवीन चांगलंच धडा मालिकेच्या एका नवीन ट्विस्टवर प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
मालिकेचा नुकताच एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये अक्षरा एका बाईच्या मागे धावत आहे. अक्षराला ती बाई भुवनेश्वरी असल्याचे वाटत आहे, मात्र ती भुवनेश्वरी नसून चारुलता आहे. त्यामुळे आता मालिकेत चारुलता येणार असल्याचा नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मार्केटमध्ये अक्षराला चारुलता दिसते. त्यामुळे ती तिच्या मागे मागे जाते. दोघी समोरासमोर येताच अक्षरा “भुवनेश्वरी तुम्ही इतके दिवस कुठे होतात? चला आपण घरी जाऊ असं म्हणते. यावर ती बाई अक्षराला “तुमचा काहीतरी गैरमसज होत आहे, मी भुवनेश्वरी नाही चारुलता आहे” असं म्हणते. हा नवीन ट्विस्ट काही प्रेक्षकांना आवडला नसून प्रेक्षकांनी याबद्दलच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
या प्रोमोखाली कमेंट्स करत प्रेक्षकांनी त्यांची मतं व्यक्त केली आहेत. “गंगाधर ही शक्तिमान है”, “भुवनेश्वरीचा नवा खेळ सुरु”, “वाढवा वाढवा अजून ५०० भाग करा”, “काहीही दाखवतात”, “चारूलता जीवंत असती तर एव्हाना परत आली असती. मुलाशिवाय कशी काय जगू शकली इतके दिवस? बरं स्वतःचं नाव लक्षात आहे तर घर, संसार, मुलगा, नवरा त्यांच्याकडे परत जायचं ना. चांगली शिकलेली होती ती त्यामुळे उगीच एकटं राहून दिवस काढेल असं वाटत नाही”, “अतिशय फालतू ट्रॅक आणलेला आहे”, “अजून वेगळी काहीतरी नौटंकी होणार” अशा कमेंट्स करत त्यांना हे कथानक आवडला नसल्याचे म्हटलं आहे. तसंच काहींनी त्यांना हा नवीन ट्विस्ट अवडल्याचेही म्हटलं आहे.
दरम्यान, या नवीन प्रोमोमधून ती बाई चारुलताची जन्मदात्री असल्याचा नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे? त्यामुळे आता या मालिकेत काय नवीन वळण येणार? चारुलतामुळे आता अधिपती-अक्षरा यांच्या नात्यात काय नवीन वळण येणार? चारुहास या चारूलताला आपली आई म्हणून स्वीकारणार का? असे अनेक प्रश्न आगामी भागातून पाहायला मिळणार आहे