Bigg Boss Marathi 5 update : बिग बॉस आणि नॉमिनेशन हे जणू एक समीकरणच आहे. घरातील सदस्य स्वतःच्या प्रगतीसाठी पुढे जाण्यासाठी आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी इतर सदस्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करतो. याचसाठी तो घरातील इतर सदस्यांना नॉमिनेट करत असतो. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या कालच्या भागातदेखील ही प्रक्रिया पार पडली असून यात सूरज, पॅडी, निखिल, योगिता, निकी5व घन:श्याम हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. काल पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील १५ स्पर्धकांनी या सहा जणांना नॉमिनेट केलं आहे. बिग बॉसने दिलेल्या टास्कनुसार घरातील बाकी सदस्यांनी या सहा जणांचे नाव नॉमिनेशनच्या यादीत टाकले आहे. बिग बॉसने घरातील सदस्यांच्या जोड्या केल्या होत्या आणि त्यांना दिलेल्या बीबी करन्सीमधून घरात लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यास सांगितली होती. या टास्कनुसार घरातील १५ स्पर्धकांमध्ये एकूण ०७ जोड्या केल्या गेल्या आणि उरलेली एक सदस्य ही अंकिता म्हणजेच घराची कॅप्टन होती. (Bigg Boss Marathi 5 update)
टास्कनुसार सर्वांनी बीबी करन्सीमध्ये आणि घरात उपयोगी पडतील अशा वस्तूंची खरेदी केली. यात खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून टॉयलेट व बाथरुमचीही खरेदी केली गेली. त्यानंतर बिग बॉसने टास्कमध्ये ट्विस्ट आणत ‘ज्याची जास्त चर्चा त्याचा नंबर वरचा’ हा नवीन टास्क दिला. म्हणजेच या टास्कमध्ये घरातील प्रत्येक स्पर्धक जोडीने घरात कमी लागणाऱ्या वस्तूं व घरात कमी चर्चा असणाऱ्या स्पर्धकांना नॉमिनेट करायला सांगितले.
या नवीन ट्विस्टनुसार, घरातील स्पर्धकांनी अनुक्रमे पॅडी-योगिता, सूरज-निखिल व घन:श्याम-निक्की या तीन जोड्यांची नावं घेतली. त्यामुळे आता हे सहा सदस्य घरातील नॉमिनेशन प्रक्रियेत आहेत असा निर्णय बिग बॉसने दिला आहे. मात्र त्याचबरोबर त्यांनी या निर्णयाबरोबरच प्रेक्षकांच्या वोटिंगनुसारच कुणीतरी एक स्पर्धक घराबाहेर जाऊ शकतो हेदेखील नमूद केलं आहे.
त्यामुळे आता घराबाहेर जाण्याच्या शर्यतीत तर पॅडी, सूरज, निखिल व योगिता हे स्पर्धक असले तरी अंतिम निर्णय हा स्पर्धकाला मिळणाऱ्या वोटिंगच्या आधारे घेतला जाणार आहे. त्यामुळे घराबाहेर नक्की कोण जाणार? हे येत्या शनिवारी-रविवारच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.